देहूरोड:
पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा,पुणे यांनी आयोजित केलेल्या पुणे जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेत कडधे ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रज्ञा माळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
‘कोरोनाकाळातील अॉनलाईन अध्यापन’ या विषयावरील त्यांच्या निबंधाने परिक्षकांची मने जिंकली.सुंदर हस्ताक्षर,मुद्देसुद मांडणी व संस्कृत भाषेतील सुवचनांचा वापर यांमुळे त्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या मराठी निबंध स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक संपादन करुन मावळ तालुक्याचे नाव उज्ज्वल केलेले आहे.
त्यांनी नुकत्याच झालेल्या मावळ तालुकास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेत तसेच पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केला होता..त्यांच्या यशाच्या या हँटट्रिकने कडधे शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रज्ञा माळी या मावळ तालुक्यातील शेलारवाडी या गावच्या माहेरवाशीण असून त्यांचे शिक्षण पवनानगर,देहुरोड व पुणे येथे झालेले आहे.मराठी भाषेचे आदर्श अध्यापक कै.जनार्दन माळी सर यांच्या त्या कन्या असून वडिलांचा ज्ञानदानाचा वारसा त्या सक्षमपणे चालवत आहेत.त्यांच्या या यशाबद्दल शेलारवाडी येथील देहुरोड कँन्टो.बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक शेलार,अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहू शेलार,माजी नगरसेवक पोपटराव भेगडे,शिक्षक नेते राजू भेगडे,ट्रस्टचे खजिनदार सुहास माळी,सामाजिक कार्यकर्ते योगेश माळी,युवा नेते सतिश भेगडे,बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संदेश भेगडे यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!