पवनानगर:
महाविकास आघाडीचे हे सरकार लोकधार्जाणे नाही हे आमदार खासदार आणि त्यांचे बगल बच्चे धार्जिणे आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही,हे माहिती नाही,पण राज्यात महिला अत्याचाराची लाट आहे.अत्याचारांना पोलीसांची भीती नाही. सरकारची भीती नाही. कायद्याचा धाक नाही. अत्याचार करणा-याला वाचवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करतेय असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
कौटुंबिक हिंसाचारात महिलाच बळी पडली, पावसाने झोडले अन नवऱ्याने मारले तर कोणाला सांगायचे. आयुष्यातली चढउतार लढण्यासाठी उपासना करायची जबाबदारी बाईचीच,समर्पण भावना ही बाईचीच,मातृशक्तीला कायदेची माहिती असावी.
आत्मविश्वास वाढवा तर महिला आत्मनिर्भर होतील असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.
मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या व विठू माऊली सोशल फाऊंडेशन वतीने लाठी काठी प्रशिक्षण समारोपात पवनानगर येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
तर केंद्रसरकारने सर्वसामान्य व्यक्तिला केंद्रबिंदू मानून आणलेल्या योजना घराघरात पोहचवा असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,सभापती ज्योती शिंदे उपसभापती,दतात्रय शेवाळे,, जिल्हा परिषद अलका धानिवले ,,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी ,माजी सभापती निकिता घोटकुले, महिलाध्यक्ष सायली बोत्रे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माऊली शिंदे ,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती राजाराम शिंदे,माजी सभापती एकनाराव टिळे ,माजी सभापती सुवर्णा कुंभार, प़्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, माजी उपसभापती गणेश गायकवाड, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे,माजी संचालक पांडुरंग ठाकर, विठू माऊली फाऊंडेशनचे संस्थापक किरण राक्षे, भाजपाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळा घोटकुले, संचालक राक्षे,गट अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, चेअरमन गणेश धानिवले,अध्यक्ष नारायण बोडके,गणेश धानिवले, सचिव पांडुरंग जांभूळकर, सरचिटणीस संदीप भुतडा,देवाभाऊ गायकवाड,विश्वनाथ जाधव, सरचिटणीस संतोष दळवी उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या,”
महिला अत्याचाराची कारवाई दोन महिन्यात झाली पाहिजे असा आदेश केंद्र सरकारने एक वर्षापासून वर्षापूर्वी काढला त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
महिलांचे अत्याचार होते.राज्य सरकार त्यावर मीठ चोळतात. महिलांची विटंबना कधी थांबणार, शिवसेनेच्या माजी पदाधिकारी सह आरोपी नाही,राष्ट्रवादी पदाधिकारी बलात्कारात आडकला आहे. आरोपीला ताब्यात न घेता आरोपीची चौकशी कशी केली जात नाही असा ही प्रति प्रश्न त्यांनी केला
अन्याय अत्याचार सहन करू नका. महिला आयोग अध्यक्ष नाही,महिला अधिवेशन बोलवा. शक्ती कायदा नाही. असे सांगून चित्रावाघ म्हणाल्या,” मुख्यमंत्री तुमच्या नाका समोर होणाऱ्या घटनांना दिसत नाहीत का?शेतकरी प्रश्न,एमपीएससी चे प्रश्न,आरोग्य भरती परिक्षा रद्द सरकारची अवस्था आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दारात अंदोलन करून, त्यांनी महाराष्ट्रात इंधनावर जीएसटी का नाही आणले नाही असा विचारा.
सायली बोत्रे यांनी प्रास्ताविक केले. सुमित्रा जाधव यांनी सुत्रसंचालन केले. प्रतिभा डहाळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!