
मुंबई:
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा “ मुंबई डबेवाला असोशिएशनने “निषेध केला असून महाराष्ट्र बंदला मुंबई डबेवाला असोशिएशनचा बंदला जाहीर पाठिंबा असल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदोलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.परंतू ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरी देखील म्हणावा तसा तपास पोलिसांनी केला नाही. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
येत्या ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या महाराष्ट्र बंदला “ मुंबई डबेवाला असोशिएशन” जाहीर पाठिंबा देत आहे.
शेतकरी आणी कामगार, भारताच्या विकास रथाची ही दोन चाके आहेत यांचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहीजे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणीत जे शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना “ मुंबई डबेवाला असोशिएशन” च्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली !
या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




