मावळमित्र न्यूज विशेष :
सह्याद्रीच्या पठारावर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वनराईत नवसाला पावणारी सटवाईदेवी मोठ्या थाटामाटात विराजमान झाली आहे.शेकडो भाविकांच्या श्रद्धेचं हे मंदिर देवीच्या नामघोषाने धूम धूम जात आहे. भाविकांची आई वर मोठी श्रद्धा असल्याने काही दिवसापूर्वी या मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार करण्यात आला. सटवाईवाडी गावाजवळ देवीच मंदिर आहे देवीच्या नावावरून गावाला सटवाईवाडी हे नाव पडलं असावं असेही बोलले जाते.
नाचणी, सावा ,वरई,तीळ, उडीद आणि भात हीच मुख्य पीक घेऊन येथे राहणारा बळीराजा देवीची मोठ्या भक्ती भावाने उपासना करतो. मंदिरापर्यंत पोहोचायला डोंगराची चढण चढून वर यावे लागते .पठारावरील हवेची झुळूक, मंद वारा अंगाला स्पर्श करतो. येथील थंडगार हवा झ-यातील तील सुमुधुर पाणी थकवा पळून जातो. मंदिरा मंदिरा च्या भोवताली असणारे पारंपारिक वृक्ष येथील निसर्गसौंदर्याचा साक्ष देते.
पूर्वजापासून सटवाईदेवीची पूजा करत आल्याची परंपरा आहे. आदिवासी बांधवांची कुलस्वामिनी आणि आराध्य दैवत समजले जाते. भाविक सटवाईला नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण होतात. लोकांची देवीवर खूप श्रद्धा आहे. आणि खेड तालुक्यातून लोक चैत्र महिन्यात देवीच्या दर्शनाला येतात. घटस्थापनेच्या वेळेस खूप लोक दर्शनाला आपल्या मुलांना सोबत घेऊन येतात.
लहान मुलाच्या नाळेची वाटी आणि नाळ या दिवशी देवीच्या पुढे ठेवतात. याच्या मागचे कारण असे की,पाचवीला सटवी येते आणि बाळाला अक्षर टाकून जाते म्हणून तिने बाळाला दीर्घ आयुष्य देण्यासाठी नाळ आणि वाटी देवीला वाहतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही जगात जननी जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहेत. सटवाई देवीच्या नावावरून येथे असलेल्या आदिवासी वाडीचे नाव सटवाईवाडी असे पडले आहे.
चैत्र येथे देवींची मोठी यात्रा असते आणि ती आदिवासी लोक थाटामाटात साजरी करतात. श्रद्धेने देवीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या पाठीशी सटवाई आई आशीर्वाद देऊ येऊन उभी असल्याची धारणा भाविकांमध्ये असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक राजकीय मंडळी येथे येऊन देवीचे आशीर्वाद घेतात कौल लावण्याचा परंपरा येथे आहे.

error: Content is protected !!