टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील पश्चिम भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. डाहूली, बेंदेवाडी, लोहटवस्तीत आढणा-या बिबटयाने आपला मोर्चा नागाथली कुसवली कडे वळवला आहे. बिबट्याने नागाथली तील दोन शेळयांचा फडशा पाडला व एक जखमी केली. मागील आठवडय़ात कुसवलीतील शेळयावरही त्याने ताव मारला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शेळयांचा वनविभागाने पंचनामा केला असून शैतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी असून अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा याही मागणीने जोर धरला आहे.
नागाथली येथील शाहिदास चिंधू खांडभोर हे आपल्या मालकी जागेमध्ये डोंगर भागाच्या अंगाशी त्यांच्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. डोंगर भागातून आलेल्या बिबट्या याने संध्याकाळी चार वाजता चरत असलेल्या शेळ्याच्या कळपामध्ये घुसून हल्ला केला. या मध्ये दोन शेळ्याचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये एक लहान शेळी जखमी झालेली आहे. ह्यामुळे गावांमध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या भागात बिबट्या पिंजरा लावून पकडावे अशी मागणी होत आहे.
नागाथली येथील शेळीपाळ शाहिदास चिंधू खांडभोर म्हणाले,” माझ्या मृत्त शेळ्या व जखमी यांची भरपाई मिळावी यासाठी वनक्षेत्र वनपाल शिरोता अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या निवेदनामध्ये जवळपास 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ते नुकसान शासनाच्या नियमानुसार भरपाई मिळावी याचा पंचनामा करण्यात आला आहे.

error: Content is protected !!