वडगाव मावळ: महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या अजितदादा पवार यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपचा हा डाव सहन करणार नाही, असा घणाघात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केला.
राज्यातील सक्षम नेते असणाऱ्या अजित दादांच्या दादांच्या कामाचा भाजप नेत्यांना पोटदु:खी आहे. त्यामुळेच अजितदादांच्या नातलगांवर केंद्रीय आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत .यामागचा कर्ता-करविता विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप मावळचे आमदार शेळके यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. कोरोना महामारी ची भयावह परिस्थिती महाविकास आघाडीने अत्यंत सहजतेने हाताळली .जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या अजितदादांच्या बद्दल गैरसमज पसरवण्यासाठी हे भाजपचे मोठे षड्यंत्र आहे. राज्यभरातल्या जनतेच्या मनात अजित दादा पवार यांच्या बद्दल आदराचं स्थान आहे. इतर राजकारण्याप्रमाणे काम प्रलंबित ठेवून जनतेला ताटकळत ठेवण्याचा दादांचा पिंड नाही .काम होणार असेल तर लगेच करणार आणि होणार नसेल तर तात्काळ नकार देणार असा तडका फडकी स्वभावाचा नेता महाराष्ट्र दुसरा कोणीच नाही .
राज्यातील तरुण पिढीमध्ये अजित दादा पवार यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळेच भाजपाच्या पोटात पोटशूळ उठला असून केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून पवार कुटुंबीय आणि नातेवाईक यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. राज्यातील कोरोनाचे संकट असो ,की निसर्ग चक्रीवादळाचा फटका असो ,अस्मानी संकटांमध्ये जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची धमक आणि दानत फक्त पवार या वलयात आहे.
लोकनेते शरच्चंद्र पवार साहेब या वयात देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुशीत आहे. त्यांना धीर देत आहे त्यांच्या कामाची री ओढून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राज्यभर काम करीत आहे.अजित दादांना बदनाम करण्याचा हा मोठा षड्यंत्राचा भाग आहे . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आघाडी सरकार वर खोटेनाटे आरोप करीत आहेत .या आरोपाला या भूलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही. भाजपाची सत्ता गेली ती सत्ता येणार नाही म्हणून हेच षड्यंत्र आहे .भाजपाचे दबावतंत्र आहे. या दबावाच्या राजकारणाला महाविकास आघाडी कधीच भीक घालणार नाही. महाराष्ट्रातली तरुण पिढी अजित दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे .अनेक महत्वकांक्षी प्रकल्प उभे करून ते तडीस नेण्याची धमक महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आहे. यात अजित दादा यात उजवे ठरतील. भाजपाच्या या षड्यंत्राचा आम्ही निषेध करीत आहोत असे ठणकावून सांगत आमदार शेळके यांनी भाजपवर तोफ डागली.
प्रत्येक दिवशी अजितदादांच्या भेटीला हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक येत आहेत. आपलं काम दादाच करू शकतात या अपेक्षेने आलेल्या नागरिकांचे अश्रू पुसण्याचे काम अजित दादा करीत आहेत .त्यांच्या कामाचा आवाका पाहता भारतीय जनता पार्टीला हे खूप दु:ख होत आहे , म्हणून बदनामी करून अजित दादा पवार व नातेवाईकांची प्रतिमा मलीन करण्याचा कारस्थाने भाजप कडून सुरू आहे .हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही असाही टोला आमदार शेळके यांनी लगावला.

error: Content is protected !!