
पुणे:
२३ ऑक्टोबर मुदत संपलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक लवचरच घेण्याचे संकेत देण्यात आले आहे.
संभाव्य मतदार यादी दहा नोव्हेंबर पर्यंत प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिली .
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका २३ ऑक्टोबर २०१९ पुढे टाकण्यात आल्या होत्या. त्या वरील स्थगिती शासनाने ३० सप्टेंबर २१ च्या आदेशान्वये उठवून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने प्राधिकरणाने आदेश काढले आहेत .बाजार समितीच्या निवडणुका साठी प्रारूप अंतिम मतदार याद्या 30 सप्टेंबरला तयार करावेत असे आदेश म्हटले आहे.
ज्या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २३ ऑक्टोबर नंतर संपुष्टात येणार आहे ,अशा समितींच्या निवडणुकांत करिता प्राधिकरणाकडून स्वतंत्र आदेश काढला आहे. बाजार समितीच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उपसंचालक व गट विकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागवण्याची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रारुप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात सदस्य सूची बाजार समितीच्या सचिवांकडे ऑक्टोबरपर्यंत सुपूर्त करावी, बाजार समिती सचिव आणि विहित नमुन्यातील परत मतदार यादी २५ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर २०२१या कालावधीत तयार करतील. बाजार समिती सचिवाने ही मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आठ नोव्हेंबर रोजी सादर करावी व त्यास वर्तमानपत्रातून प्रसिद्धी द्यावी असे सुचविण्यात आले आहे. कोरीनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे या आदेशात म्हटले आहे.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




