वडगाव मावळ:
युवा पर्व फाऊंडेशन, मावळ यांच्या वतीने मोफत स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा पर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी केले आहे.
हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून लाभार्थ्यांना राहण्याची देखील मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन गायकवाड यांनी केले.मावळ तालुक्यातील बेरोजगार तरुणांकरीता, स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनण्याची ही सुवर्णसंधी आहे.
शेतीपुरक व्यवसाय प्रशिक्षण महिलांसाठी व पुरुषांसाठी असणार आहे. कुक्कुटपालन,संगणक अंकांऊटींग (टॅली)
,फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी,दुग्ध व्यवसाय , मोबाईल फोन दुरुस्ती,,कृषी पर्यटन,शिवण काम (महिला -पुरुष)
,महिलांकरिता केक बनविणे प्रशिक्षण,ब्युटी पार्लर या विषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थीच्या प्रशिक्षण , निवास व भोजनाची व्यवस्था पुर्णपणे विनामुल्य केली जाईल
पात्रता व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा असावी,शिक्षण किमान ७ वी पास.
, वयाचा पुरावा (वय १८ ते ४५ वर्षे) ,आय कार्ड साईजचे ५ फोटो,आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणावे.
प्रत्येक प्रशिक्षणासाठी मर्यादीत जागा उपलब्ध आहेत. कोर्स यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट देण्यात येईल. वरील कार्यक्रम नियोजित असुन प्रत्यक्ष सुरुवात
होण्यास विद्यार्थ्याची किमान २५ ही संख्या अपेक्षित आहे.
संख्येच्या उपलब्धतेनुसार बॅचेस मागेपुढे होऊ शकतात.
*व्यवसाय चालु करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी सहकार्य
(कर्जासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्राची पुर्वता करावी.)
नांव नोंदणीसाठी संपर्क
युवा पर्व फाऊंडेशन, मावळ स्थळ : कामशेत एरंडे कॉम्प्लेक्स, वेळ स. ११ ते ०२
दि. २० ऑक्टोबर २०२१ ते २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत
8857849900, 9765137311,
9049301267 ,7249401209,
8698985844, 9527400240 ,9075486127
8888710755 ,9922340463 ,9850717029.

error: Content is protected !!