टाकवे बुद्रुक:
ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक यांच्यामार्फत सरपंच भूषण असवले व उपसरपंच ऋषीनाथ शिंदे टाकवे गावामध्ये आजूबाजूच्या ठिकाणांमध्ये अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारी ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक यांच्या वतीने टाकवे वडेश्वर मुख्य रस्ता, टाकवे येथील बुद्ध विहार त्याठिकाणी अनिल बबन जाधव यांच्या घरासमोरील रस्त्यावरती गेले काही दिवसांपासून गटारीचे पाणी येऊन खूप मोठी समस्या निर्माण झाली होती.
ती समस्या सोडवण्यासाठी आज ग्रामपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी जेसीबी लावून गटार पूर्णपणे साफ करून सुरळीत करण्यात आले यामुळे, त्या ठिकाणच्या भागात गटाराचे पाणी रस्त्यावरती पाणी येत असल्यामुळे गाडी चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावरती पाणी असल्यामुळे गाडी चालवताना नागरिकांच्या अंगावरती पाणी उडाल्यामुळे वाहन चालक व नागरिकांमध्ये वादावादी सुद्धा होत होती.
या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून येथील समस्या सुटली आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच भूषण असवले व उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, सदस्य परशुराम मालपोटे यांचे कौतुक केले आहे.
सरपंच भूषण असवले म्हणाले,”
याठिकाणी अनेक महिन्यांपासून ही खूप मोठी समस्या होती, तसेच हा मुख्य रस्ता असल्यामुळे पर्यटक कामगार वर्ग व आंदर मावळ मधील 40 ते 42 गावच्या नागरिकांची वाहतुकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, या पाण्यामुळे गाडी चालवताना गाडी चालक यांना समस्या खूप होत होत्या,तसेच येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
त्याची दखल घेत आज ग्रामपंचायतीमार्फत सरपंच व उपसरपंच यांच्या पुढाकाराने या ठिकाणी जेसीबी मशिनच्या साह्याने गटाराची दुरुस्ती करण्यात आली आहे.
येणाऱ्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी मोऱ्या टाकून बंदिस्त गटारे करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच भूषण असवले उपसरपंच ऋषीनाथ शिंदे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!