कार्ला : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिराचे दरवाजे आज घटस्थापनेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. कोरोनाचे संकट कमी झाल्याने मंदिर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी कोरोना अद्याप संपलेला नाही. याकरिता वडगाव मावळ येथील प्रशांत वहिले प्रतिष्ठाण व रिच कलेक्शन यांच्या वतीने आज गडावर देवीचे पुजारी, गुरव, कर्मचारी यासर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले.
घटस्थापनेच्या पहिल्या माळेचा विधी संपन्न झाल्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उद्योजक राजेश ढोरे, राष्ट्रवादी काँ.मा.ता.युवा सचिव शैलेश वहिले, युवा नेते सोमनाथ बोत्रे, पांडुरंग बोत्रे, गणेश पवार, विराज वहिले आदींनी मुख्य पुजारी संजय गोविलकर, संतोष देशमुख, तेजस खिरे, राजु देशमुख, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड , बाळासाहेब गायकवाड यांना मास्कचे वाटप केले. याप्रसंगी वेहेरगावचे सरपंच अर्चना देवकर, उद्योजक संदिप देवकर, उपसरपंच काजल पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, सुनिता देवकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!