
तळेगाव स्टेशन :
येथील स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने कोरोना नियमाचे पालन करून महालक्ष्मी देवीची घटस्थापना राजेंद्र कदम व श्रेया कदम यांच्या हस्ते
करण्यात आली. यावेळी मंजु ढेरंगे, महावीर पाटील,संजय देशमुख,दिपेश लाड,विशाल गायकवाड,सागर वडर उपस्थित होते.
सार्वजनिक मंडळाचे नवरात्र उत्सव साजरा करण्याची हे अकरावे वर्ष असून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयी उपक्रम राबवणार असल्याचे स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रपती पोलीस पदक विजेते लहू पाटील बुवा ढेंरंगे यांनी सांगितले.सर्व भाविकांना मास्कचे वाटप केले जाणार आहे. सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे.
सामाजिक अंतर ठेवून सर्व उपक्रम राबविले जातील आरतीच्या वेळेस योग्य अंतर ठेवून आरती केली जाणार आहे.
त्याप्रमाणे वृक्षारोपण,आरोग्य तपासणी शिबीर, मोफत चष्मा वाटप,नेत्र व रक्तदाब तपासणी असे उपक्रम मंडळातर्फे केले जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका सुलोचनाताई आवारे व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोरभाऊ आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळ काम करीत आहे. लहू पाटिलबुवा ढेरंगे (अध्यक्ष) मारुती अरगडे (उपाध्यक्ष) महावीर पाटील (खजिनदार) शशिकांत धंगेकर (कार्याध्यक्ष) राजेंद्र लावरे (सचिव) पल्लवी वंजारे( उपसचिव) रामदास वाडेकर (सल्लागार)असून अनुक्रमे दत्तात्रेय जाधव, सुनील शेट्टी, सीमा दिवेकर यससौरभ सावंत, विराज सावंत, अमोल जाधव, श्रीरंग गायकवाड ,पंकज पवार, हेमा वराडे, अभिजीत शिंदे, निर्मला नाईक ,संजय देशमुख, सुनील चौधरी, सविता सुतार ,कल्याण भाग्यवंत स्वाती सोनकुसरे ,भूषण जवखेडकर सदस्य काम करीत आहे. स्वप्ननगरी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष अनुक्रमे श्रीरंग गायकवाड, दीपक जवखेडकर, गणेश बाबर ,चेतन बच्छाव, संजय वडगामा हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे
शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून नवरात्रोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर मंडळाचा भर असणार आहे महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे असे आव्हान केले आहे याच अनुषंगाने नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्र जाऊन लसीकरण करावे लसीकरण नोंदणीसाठी मंडळाच्यावतीने सहकार्य करणार असल्याचे सौरभ सावंत यांनी सांगितले.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप




