वडगाव मावळ:
आंदर मावळातील खांडी येथे अवकाळी पावसात अंगावरती वीज पडून त्यात चौदा वर्षीय राज भरत देशमुख याचा दुर्दैवी मृत्यू झाला.वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सायंकाळी वाजता राज रानात चरायला गेलेली बैल घरी आणण्यासाठी गेला होता.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्याने रस्त्यालगत असलेल्या झाडाच्या आडोशाला थांबला होतो. त्या ठिकाणी वीज पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी जवळ वीजरोधक टॉवर उभा केला आहे.शासनाच्या नियमानुसार टॉवरच्या पासून 2 किलोमीटर पर्यंत विजेचा धोका निर्माण होत नाही, मग प्रश्न असा निर्माण होतो की वीज कशी पडली ? ही घटना घडली त्यापासून काही अंतरावर हा वीजरोधक टाॅवर उभा करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत हद्दीत ही उपकरणे बसवली आहेत त्या उपकरणाची ऑडिट होणे आवश्यक आहे. चौकशी होणे खूप गरजेचे वाटत आहे.
ही उपकरणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी तर ना ना ? असा प्रश्न खांडीचे सरपंच अनंता पावशे व खांडी शाखा शिवसेना प्रमुख रमेश नगरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच गावात काही वर्षांपूर्वी माजी जि.प.सदस्य भरत मोरे यांच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दत्तू नगरकर यांनी काही जागा बक्षीस पत्रा द्वारे दिली होती. त्या नंत्तर प्राथमिक उपकेंद्र बांधून पूर्ण झाले ,त्या ठिकाणी कोणीही नर्स,डॉक्टर उपलब्ध नाही आणि येतही नाहीत, जर तो दवाखाना सुरु असता तर कमीतकमी उपचार तरी करता आला असता, कदाचित त्या बालकाचा जीव तरी वाचला असता असे ही यांनी खंत बोलून दाखवली.
खांडीवरून कान्हे फाटा येथे एका प्राव्हेट गाडीतून 35 किलोमीटर अंतरावरती प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणावे लागले.तो पर्यंत खूप उशीर झाला होता. म्हणून खांडी येथील सदरील दवाखाना ताबडतोब सुरू करावा जेणेकरून पुढील दुर्घटना तरी होणार नाही,अशी मागणी खांडी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक विजय वडोरे,किरण नांगरे सिद्धार्थ वाघमारे,सचिन काळे यांनी भेट दिली.

error: Content is protected !!