वडगाव मावळ:
घटस्थापनेच्या पूर्वेला मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरवासियांना तिळाची फुले व विड्याच्या पानांचे मोफत वाटप करण्यात आले.
नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी महत्वाची असणारी पण दुर्मिळ होत चाललेली तिळाची फुले नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या तर्फे शहरवासियांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती, सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
यावेळी कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिलीप वहिले, प्रकाश कुडे, दिनेश पगडे, महेंद्र ढोरे उपस्थित होते.

error: Content is protected !!