जनसेवक दिलीप राक्षे यांच्या वतीने पवनमावळातील सर्व शाळांमध्ये सॅनेटाईझर व मास्कचे वाटप करण्यात आले
पवनानगर : करोनामुळे तब्बल गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा काल, (दि. ४ ) पासून सुरू करण्यात आल्या. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शाळेच्या पहिला दिवशी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊ स्वागत करण्यात आले.
ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत, तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल देखील नाहीत. अशा विद्यार्थी आणि पालकांतर्फे ऑफलाइन शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर करोनामुक्त गावांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शासनाने दिलेल्या नियमानुसार शाळेने दररोज शाळा व परिसर सॅनेटाईझर फवारणी करणे तसेच विद्यार्थ्यांना मास्क शाळेने उपलब्ध करून देणे तसेच शक्य असल्यास शाळेत रुग्णालय उभे करून विद्यार्थी व शिक्षकांना आरोग्य सुविधा पुरविणे असे नियम घालण्यात आले आहे.परंतु अगोदरच ग्रामीण भागातील शाळांची आर्थिक स्थिती अतंत्य नाजूक असल्याने हे शाळांना शक्य नाही म्हणून शाळेने परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी आवाहन केले या आव्हानाला लगेच प्रतिसाद देत साळुंब्रे गावचे माजी सरपंच दिलीपदादा राक्षे हे धावून आले व पवनमावळातत असलेल्या १८ शाळांमध्ये वर्षभरासाठी लागणारे सॅनेटाईझर,मास्क व शाळेसाठी तत्पर आरोग्य सुविधा देण्याचे जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी करून त्याची सुरुवात काल पवन मावळातील पश्चिम भागातील शाळांमध्ये जाऊन केली अनेक शाळेला सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले
पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल मोहोळ, पवनमामावळ विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस अमित ठाकर, जनसेवक दिलिपदादा राक्षे युवामंचाचे पदाधिकारी
अक्षय तुपे,राहुल पोटफोडे, सागर काळे,विवेक कालेकर, शक्ती कालेकर, तानाजी आढाव
संदेश मोरे,पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर, संकल्प शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे,कै.सरुबाई पांडुरंग दळवी कॉलेजचे प्राचार्य राहूल कराळे,शिक्षक, प्राध्यापक आदी उपस्थित होते.
दिलीप राक्षे युवा मंचाच्या वतीने
पवनानगर येथील पवना विद्या मंदिर पवनानगर,पवना ज्युनिअर कॉलेज,न्यु संकल्प इंग्लिश स्कुल,कै.सरुबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज,वारु कोथुर्णे माध्यमिक विद्यालय,कोथुर्णे येथे जाऊन साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना दिलीपदादा राक्षे म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा देशाचा नागरिक आहे तो निरोगी राहिला तर देश निरोगी राहील व आपण कोरोनावर मात करु शकतो कोरोना आजुन संपलेला नाही त्यासाठी विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी हा प्रयत्न आहे काल पवन मावळातील पश्चिम भागात साहित्याचे वाटप केले असून पुढीलकाळात राहिलेल्या शाळांमध्ये साहित्य वाटप केले जाईल.
बापुसाहेब पवार,भारत काळे,संजय हुलावळे, गणेश ठोंबरे,मोहन शिंदे,संदिप शिवणेकर,गणेश साठे,मिनल खैरे आदि शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!