गडद:
भाग्या ठाकर खेड तालुक्यांतील पश्चिम भागांत गडद आणी कोळये गावा दरम्यांन डोंगरपायथ्याशी टेकाडावर वसलेल्या ठाकरवाडीत रहातो.
भाग्या ठाकर याला झाड-पाला मुळी कंद व वनस्पती औषधाची बरीच माहीती असल्या मुळे पंचक्रोशीत तो झाड-पाल्यांचे औषध देणारा ठाकर अशी त्याची ओळख. त्याची ही माहीती बरीच वर्ष ऐकत आल्याने मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर सुट्टीसाठी गावी आले.
त्यांनी सांगितला हा त्यांचा अनुभव तळेकर म्हणाले,”
मुंबईलाच असताना ॲसिडीटीचा त्रास नको म्हणून मी माझ्या फॅमिली डॅाक्टर कडून औषध घेऊन गेलो होतो. परंतु त्या औषधाचा म्हणावा तसा परिणाम जाणवत नव्हता. मग मला गावातील काहींनी सल्ला दिला तू आता गावी आलाच आहे .
तर भाग्या ठाकराला भेट तो काही झाड-पाल्याचा दवा देतो का बघ. तो दव्याचे पैसे ही घेत नाही. बर त्याचा साईटईफेक्ट ही नाही. या सर्व बाबीचा विचार करुन मी भाग्या ठाकरा कडे जायचे ठरवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजताच ठाकरवाडी गाठली.ठाकरवाडीत अनेक ठाकरांची घरे ही ठाकर संस्कृती चे दर्शन घडवीत होती. कळकट मळकट घरे त्याच्या कारवीच्या सारवलेल्या भिंती वर गवताचे छप्पर बाजूलाच लागून बक-याचा वाडा अशी सर्व ठाकरवाडीची रचना.आता यात भाग्या ठाकराचे घर कोणते ? काही कळायला मार्ग नव्हता. इतक्यात एक ठाकर गडी बकऱ्या घेऊन रानात निघाला होता. त्याला मी विचारले दादा,भाग्या ठाकराचे घर कोणते ? तर त्यांने मला ते घर दाखवले ठाकरवाडीत मध्य भागी या भाग्याचे घर होते.
भाग्या ठाकराच्या दारात गेलो आणी त्याला हाक मारली. त्याचा प्रतिसाद यायच्या आधीच त्याची कुत्री माझ्यावर भुकूं लागली. थोड्या वेळात तो ही बाहेर आला. त्याने मला नाव आणि गाव विचारले. मी माझे नाव आणी गाव सांगून मोकळा झालो. त्याने मला ओळखले नाही. त्यांनेच विचारले की गंगाराम तळेकर(बुवा) यांचे आपण कोण ? मी ही म्हणालो मुलगा. तर त्याला अतीशय आनंद झाला.तो वडिलांना चांगलाच ओळखत होता.
मी ही त्याला ॲसिडीटी साठी दवा घ्यायला तुझ्या कडे आलो आहे असे सांगीतलें. तो परत घरात गेला कोणते तरी सुकलेले फुल घेवुन आला. आणी म्हणाला सकाळी अनशा पोटी थोडे चाखा आणी खा.
मी ते फुल घेतले आणी त्याला पैसे विचारले तर त्यांनी सांगितले मी पैसे घेत नाही.मी फारच आग्रह केला तेव्हा तो म्हणाला देवा-हात देवा च्या पुढ्यात तुम्हाला काय ठेवायचे ते ठेवा.मग मी शंभर रूपयाची एक नोट देवा,-हात ठेवली.आणि त्याची माहीती घेऊ लागलो मी त्याला पहिले विचारले,
भाग्यादादा तुला ह्या झाड-पाला वनऔषधी वनस्पतींची माहीती कोणी दिली ? तर त्याने ऊत्तर दिले की माझ्या सासऱ्याने. आणी सासऱ्याने महत्व पूर्ण दवा दिला तो सर्पदंशावरचा उतारा. कोणत्याही सर्पाने माणसाला दंश केला. तर त्याला ते औषध दिले की सर्पाचे विष त्या माणसाला बाधत नाही. अगदी नागा सारख्या सर्पाचे देखील. माझा तर या वरती विश्वास बसेना पण भाग्या मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होता. त्याने अशा काही केसेस हाताळल्या होत्या. व त्यात तो यशस्वी देखील झाला होता. त्याच्या या कामांची साक्ष अख्खी ठाकरवाडी होती. मुतखडा या वर तो प्रभावी दवा देतो. या कामी काही आर्थीक लाभ तो घेत नाही. त्याचे मनोमन कौतुक करत त्याचा मी निरोप घेतला.

error: Content is protected !!