तळेगाव दाभाडे:
भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने सहा शेतकऱ्यांना गाडीने चिरडल, त्यामध्ये सहा शेतकरी मृत्यू पावले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी वाद्रा या जात असताना योगी सरकारने पोलिस बळाचा वापर करून प्रियंका गांधी यांना अटक करण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली. याचाच निषेध म्हणून तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने योगी सरकारचा निषेध व्यक्त केला.
अमर खळदे यांनी हे राम राज्य नसून रावण राज्य आहे आणि यांच्या तोंडात राम आचरणात नथुराम आहे असे खडे बोल सुनावले.
लिगल सेल तर्फे अँड.सुधीर भोंगाडे यांनी निषेध नोंदवला .तळेगाव शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी हाथरस प्रकरणाची आठवण करून योगी सरकार हे जुलमी सरकार आहे, या सरकारने न्यायव्यवस्था चे धिंडवडे काढले आहे असे सांगितले. राजेंद्र फलके यांनी प्रास्ताविक केले. विशाल वाळुंज यांनी आभार मानले.
यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे ,नरेश आगरवाल ,विलास नांगरे ,अभिषेक गोडांबे ,प्रभाकर ओमकार ,अक्षय पोटे ,संकेत खळदे ,महेश खळदे ,भूषण खळदे ,पंढरीनाथ मखांमले ,अभिजित चौधरी,अमोल दाभाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!