कामशेत:
सहयाद्री विद्यार्थी अकादमी मावळ व आर्टस् इवालुशन डान्स अकॅडमी मावळ या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यामध्ये प्रथमच भव्य राजस्तरीय नृत्य स्पर्धा ( सोलो/ ग्रुप ) नृत्य तांडव २०२१ ह्या स्पर्धेचे आयोजन लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय नायगाव कामशेत मावळ या ठिकाणी करण्यात आले होते.
मागील दोन वर्षांपासून कलाकार खूप मोठ्या संकटाना सामोरे जात होते सर्वत्र कार्यक्रम बंद होते.
आपली कला सादर करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ त्यांना उपलब्ध नव्हते.
ह्या सर्व कलाकारांना त्यांचे कलागुण नृत्य स्वरूपात सादर करण्यासाठी व एक हक्काचे व्यासपीठ मिळावे ह्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने राजस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती आपल्या प्रस्तावने मध्ये सह्याद्री विदयार्थी अकादमी मावळ चे विद्यमान अध्यक्ष चेतन वाघमारे यांनी दिली.
तर स्पर्धेचे नियम व काही अटी आपल्या मनोगतामध्ये आर्टस् इवालुशन डान्स अकॅडमी मावळचे संस्थापक हेमंत पानसरे यांनी मांडल्या.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व नटराज पूजन तसेच फित कापून उदघाटन सोहळा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश वंदनेचा नृत्य अविष्कार सादर झाला.
स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे,लोणावळा, नगर,नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणाहून स्पर्धेस स्पर्धक आले होते लहान वयोगटामध्ये एकूण 54 सहभागी स्पर्धेकांची नावं नोंदणी होती तर मोठया गटामध्ये 28 सहभागी स्पर्धेकांची नावं नोंदी झाली होती व ग्रुप मध्ये जवळ जवळ 20 ग्रुप डान्स ची नोंदणी झाली होती.
वरील स्पर्धेसाठी मुख्य प्रयोजक हॉटेल शिवराज मावळ अतुलदादा वायकर, मावळचे युवा नेते देवाभाऊ गायकवाड, साक्षी डायग्नोस्टिक सिद्धार्थ किल्लावाला, युवा नेते नितीन भाऊ मराठे,पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, छावा ग्रुप मावळ अध्यक्ष भरत नाना राजीवडेशौर्य ऑप्टिक्स संभाजी डांगे,मावळ तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष नवनाथ चोपडे, लायन्स क्लब तळेगाव दाभाडे मावळ,युवा नेते प्रसाद चोपडे, निसर्गराजा ग्रुप पिंपरी चिंचवड आदींचे होते.
* राजस्तरीय नृत्य स्पर्धा नृत्य तांडव विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे *
– लहान गट- ( वयोगट 14 वर्षाखालील )-
प्रथम क्रमांक – आर्या नारंगीकर
द्वितीय क्रमांक – प्राची कांबळे
तृतीय क्रमांक – प्राची पवार
उत्तेजनार्थ 1 – ईशा दहिवार
उत्तेजनार्थ 2 – सई जगताप
– मोठा गट -( वयोगट 14 वर्षावरील )
प्रथम क्रमांक – वैष्णवी गुप्ता
द्वितीय क्रमांक – प्रदीप गुप्ता
तृतीय क्रमांक -एस. बॉय
उत्तेजनार्थ 1 – प्रशांत अरवाडे
उत्तेजनार्थ 2 – हर्ष रावल
– समूह नृत्य विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक – स्टेप आर्ट डान्स ग्रुप.
द्वितीय क्रमांक – इंडियन मारवलं ग्रुप.
तृतीय क्रमांक – जी. एन. डी डान्स ग्रुप.
उत्तेजनार्थ – सचिन डान्स ग्रुप.
विजेत्या स्पर्धकांना दोन्ही संस्था व मुख्य प्रयोजक यांच्या वतीने रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना देखील सहभागाबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सह्याद्री विदयार्थी अकादमी मावळ चे सर्व पदाधिकारी त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष चेतन वाघमारे, किरण ढोरे, लक्ष्मण शेलार सर, सचिन शेडगे,अश्विन दाभाडे, सोमनाथ चोपडे, किशोर वाघमारे, अनिकेत आंबेकर, विशाल सुरतवाला, सचिन गवारे,तर आर्टस् इवालुशन डान्स अकॅडमीचे अध्यक्ष हेमंत पानसरे, मंगेश साळुंखे, अविनाश शिंदे, विपुल शिंदे तसेच दोन्ही संस्थांचे सर्व सदस्य यांनी केले.
कार्यक्रमास काही मान्यवर भेटी दिल्या त्यामध्ये डॉ. विकेश मुथा, युवा नेते स्वामी गायकवाड, मोहन वाघमारे, मोहित कदम, विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार सर व अविनाश शिंदे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार सचिन शेडगे यांनी मानले.

error: Content is protected !!