वडगाव मावळ:
सकारात्मक उर्जा घेऊन व्यवसायात सातत्य ठेवून काम करणारा वडगाव मावळ येथील युवा उद्योजक अतुल खंडूजी वायकर .हा तरूण युवा पिढीचा आयडाॅल आहे.व्यवसायात मिळालेल्या यशाला या तरूणाने लोकसेवेचा जोड दिला.अन राज्यात हाॅटेल शिवराज आणि अतुल वायकर या नावाचा दबदबा झाला.
नावात काय आहे.असे कोणी विचारले तर नावात मान,सन्मान,पद,प्रतिष्ठा आणि बरेच काही नावात आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अतुलने काय कमवले तर नाव.
आणि या कमावलेल्या नावा भोवती आपसूक सगळे आलेच. पण हे सगळ यायला त्याने कष्ट केले संयम ठेवला. वडील धा-यांचे ऐकले. त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले.आणि वडगाव मावळ च्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील चौकाचे रूपडे बदलले वडगांव मावळ मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेले गाव. कोर्ट कचेरी आणि तहसीलच्या कामासाठी नागरिकांची येथे रीघ असते. गावागावातील कारभारी शासनाच्या योजनांचे प्रस्ताव घेऊन इथल्या,पंचायत समिती कार्यालयात येतात.नेहमीचे गर्दीने फुललेली वडगाव मावळची बाजारपेठ. पुणे मुंबई शहराच्या मध्यावरचे शहर. या शहरांतील खंडूजी वायकर आणि सीताबाई वायकर यांचा लाडका चिरंजीव अतुल. बी. काॅमची पदवी घेतला हा तरूण नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात उतरला.
कुटुंब शेतीशी जोडलेले,शेती आणि दूध व्यवसायात राबणारे अतुलचे आई वडील. आई नाणोली येथील राम धुमाळ यांची बहीण. याही माऊलीची शेतीवर मोठी निष्ठा.नोकरीत काही दम नाही अशी शिकवण असलेल्या अतुल यांनी हाॅटेल शिवराज थाळीचा ब्रॅण्ड राज्यभर पोहचवला. या थाळीची चव अभिनेते नाना पाटेकर,महाराष्ट्र केसरी रफीक शेख यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी चाखली .नोकरदार,सर्वसामान्य शेतकरी,व्यापारी,तरुणाईने या चवीला आपलेसे केले. अतुलचा मुलगा ‘शिवराज ‘याच्या नावाने हे हाॅटेल सूरू आहे.
लवकरच अतूलची कन्या शिवाली हिच्या नावाने प्युअर व्हेजचा ब्रॅण्ड येणार आहे. अतुलच्या या यशात आईवडीलांचे आशीर्वाद आहे. पत्नी पूनम यांची साथ आहे. या शिवाय या यशाचे मार्गदर्शक,प्रेरणास्थान अतुलच्या बहीणी आणि दाजी तळेगाव येथील मणिषा विलासशेठ काळोखे,विलासशेठ काळोखे,खराबवाडी येथील अनिता युवराज सोमवंशी, युवराज सोमवंशी बंधू श्रीकांत वायकर चुलते पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर, बंडोपंत निकम हे आहेत. या सगळयांचे मार्गदर्शन कायमच लाख मोलाचे ठरले आहे.
व्यवसायात मोठयांचे आशीर्वाद हवे तशी मित्रांची साथ हवी विकास सातकर,रमेश भुरूक,सागर आगळमे आणि अन्य मित्रांची साथ मिळत आहे. कोरोना महामारीत अनेकांच्या हाताचे काम गेले. हातावर पोट असणा-यांसाठी अतुलने सूरू केलेल्या शिवराज मोफत भोजन थाळीने अनेकांच्या पोटाची भूक मिटली. अनेकांना मदतीचा हात देणारे अतूल वायकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून रांजल्या गांजल्याना मदतीचा हात दिला आहे. व्यवसायात राबणारे अतलचे हात समाज कार्याला सदैव पुढे असतात.समाजासाठी राबणा-या या हाताला अधिक बळ मिळो,व्यवसायात अधिक भरभराट होऊन अतुल वायकर यांची सगळी स्वप्न साकार होवो हीच आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा.
अनेकांना शुभेच्छा देणा-या अतुल वायकर यांच्यावर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अतुल यांच्या कामाची आणि कार्याची दखल प्रसारमाध्यमे सातत्याने घेत असून सोशल मीडियावर हा तरूणाचे मोठे फाॅलोवर्स आहे.हा सगळा लेखन प्रपंच अतुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराकडून अतुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!