टाकवे बुद्रुक:
माहेरी संस्काराची जोड आणि सासरी राजकारणाची वारसा जोपासण्याचे कसब जोपासत त्यांनी पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अपयश गिळले. पतीच्या पराभवाला पायदळी तुडवून पुन्हा उभ केले. नव्याने लढण्यासाठी.पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या राजकीय कर्तबगारीची पाठराखण केली. त्यांच्या शैक्षणिक कार्याला बळ दिले आणि तीन पिढयाचा वारसा चालवून गाव कारभाराच्या निर्णय प्रकियेत महत्वाचा सहभागही घेतला.
लाडकी लेक,प्रेमळ बहीण,खंबीर पत्नी,आदर्शवत सून,कुटुंबवत्सल आई अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थ पणे चालवून पतीच्या राजकीय करिअरला आलेल्या अपयशावर मात करण्यासाठी त्या राबत आहे. एकदा आलेले अपयश हे कायमचे नसते.या अपयशावर मात करून विजयाची माळ गळ्यात आणि भंडारा गुलालाची उधळण अंगावर घेण्यासाठी तिचे पाऊल सकारात्मक दृष्टीने पडत आहे. ती आज पतीच्या यशासाठी फक्त परमेश्वराला साकड घालून बसली नाही,तर यशाची विजयश्री खेचून आणण्यासाठी ती पुढे सरसावली आहे.
अश्विनीताई शिवाजीराव असवले असे या गृहिणीचे नाव. तळेगाव दाभाडे येथील ज्योतीराम भेगडे व सुमन भेगडे यांची लेक. भेगडेंची लेक. असवलेची
सून झाली. टाकवे बुद्रुक येथील कै.गुणाजी लक्ष्मण असवले यांच्या परिवारातील अश्विनी ताई स्नुषा.कै.गुणाजी असवले टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच. तर अश्विनी ताई यांचे सासरे चिंधू मारूती असवले टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच त्या पाठोपाठ सरपंच असा दुहेरी मान मिळवलेले काँग्रेस व त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते.
काँग्रेस विचारसरणी असलेल्या या परिवाराच्या राजकारणात अनेक पिढ्या सक्रीय आहे
विठ्ठलराव असवले गावचे पोलीस पाटील,दतात्रय असवले माजी उपसरपंच,भूषण असवले टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच,पुतणे अविनाश असवले माजी उपसरपंच व सदस्य,सूनबाई सुवर्णा असवले सदस्या असा राजकीय वरदहस्त असलेल्या परिवाराच्या अश्विनी ताई सून बाई.
पती शिवाजीराव असवले राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष,पुढे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष,तालुका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अशा पदांवरून पक्ष संघटनेचे काम करीत राहिले. याच दरम्यान,त्यांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून आंदर मावळात पहिले इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. राजकारणाला समाजकारणाची जोड देत शिवाजीभाऊंचे शैक्षणिक कार्य दिवसागणिक बहरत होते. या कार्याची दखल घेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवाजी असवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातुन निवडणूक लढले आणि अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले. टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला या बालेकिल्ल्यात त्याचा पराभव बंडखोरीने झाले. या पराभवाचा परिमाण तालुक्याच्या राजकारणावर झाला. पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आली. अगदी सर्वसामान्य परिवारातील शिवाजी असवले यांच्या पराभवाचा उर्मी घाव शिवाजी असवले यांना बसला. सर्वसामान्य माणसाला आलेले अपयश जिव्हारी लागते. यातून तो सावरले यांची शक्यताही कमी असते. पण शिवाजीराव सावरले. त्याच्या सावरण्यात मित्र परिवार,नातेवाईक,पक्ष संघटनेतील नेते मंडळी यांचा सहभाग आहेच. या सगळ्यात जास्त सहभाग अश्विनी ताई थांचा आहे. त्याच्या धीरोदात्त भूमिकेने शिवाजीराव यांना मोठा आधार मिळाला धीर मिळाला. यातून ते दिवसागणिक सावरले ते लढण्यासाठी,जिंकण्यासाठी.या सगळ्यात अश्विनी ताई यांची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्वाची ठरली.या माऊलीने प्रपंच संभाळला आणि पतीच्या अपयशावर हळूच फुंकर मारली. अश्विनी ताई टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला उपसरपंच होत्या. त्यांनी कुटूंबाचा वारसा चालवला. आजही त्याची भूमिका फार महत्वाची आहे. राजकारणात यश अपयश,चढउतार असतोच पण सुखी संसार,समृद्ध प्रपंच हाही तितकाच मोलाचा असतो. शिवाजीराव यांच्या शैक्षणिक कार्यासह राजकारण,समाजकारणाला त्या पाठींबा देत आहेत.अश्विनी ताई यांचा आज वाढदिवस या वाढदिवशी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.ताई आपण पाहलेली स्वप्न अंगणात बहरावी, आपल्या स्वप्नांना यशाची किनार लाभावी याच आजच्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!