पिंपरी:
भारत मातेच्या ७५ अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रथमच नाविन्यपुर्ण प्लेस मेकिंग उपक्रम राबवीत आहे या उपक्रमात संस्कार प्रतिष्ठान,इनर व्हिल क्लब पिं चि शहर, ब प्रभाग आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्ताने पवना नदी स्वच्छता अभियान व चिंचवड भागातील घाटांची स्वच्छता अभियानाला हॉटेल रिव्हर व्ह्यु घाट व नदी स्वच्छता अभियानाचा सुरुवात झाली.
महात्मा गांधी जयंती साजरी केली .महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर चे केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे यांच्या हस्ते पुष्पहार घालुन पूजन केले. त्यानंत्तर आज सलग दुसरा दिवस मोरया गोसावी घाटावरील गवत काढले प्लॕस्टीक,पाण्याच्या बाटल्या,कुजलेली झाडे,नदी पात्रातील निर्माल्य,प्लॕस्टीक जमा केले संपुर्ण घाट घाटावरील पायऱ्या वरील गवत काढुन स्वच्छता अभियान राबविले.
जवळजवळ १ टन कचरा व गवत काढले ब प्रभाग अधिकारी सोनम देशमुख,सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ
मोहन गायकवाड,इनर व्हिल क्लब अध्यक्षा वैशाली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव भरत शिंदे,संचालिका प्रिया पुजारी,अनुषा पै,संध्या स्वामी,प्रदिप बांदल,रमेश भिसे,सुदर्शन दरेकर,आनंद पुजारी यांनी संयोजन केले होते यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक शिवाजी कदम,उद्योजक विलास लोहार,प्रकाश गडवे सर,पल्लवी नायक,निकम मेहता,समिक्षा दिपेन समर्थ,दिपक पवार,बळीराम शेवते सहभागी झाले होते.
या उपक्रमातील सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले, मोरया गोसावी संस्थानच्या वतीने संस्थेचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.सलग तीन दिवस वेगवेगळ्या टीम तयार करुन तीन घाटांची स्वच्छता केली जाणार आहे.

error: Content is protected !!