नवलाखउंब्रे:
महाराजस्व अभियानाअंतर्गत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून नवलाखउंब्रे व बधलवाडीत शासन आपल्या दारी व महालसीकरण अभियानास नागरीकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
आमदार सुनील शेळके , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच नामदेव शेलार , युवक अध्यक्ष कैलास गायकवाड ,युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, उद्योजक सुधाकर शेळके, राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले , निलेश मराठे कल्पेश मराठे, ललिता कोतकुळकर,मयूर नरवडे,पंडित दहातोंडे ससविता बधाले, वर्षा काळोखे,सविता जाधव ,उषा दरेकर,संग्राम कदम,ग्रामसेवक मॅडम घोडेकर नवलाख उंबरे गावातील नवनाथ पडवळ,तानाजी पडवळ ,बाळासाहेब बधाले,सोपान नरवडे, संतोष नरवडे,संदीप शेटे रामनाथ बधाले,स्वप्नील शेटे ,भगवान दरेकर,जालिंदर शेटे,सागर पडवळ,माणिक जाधव ,लक्ष्मण नरवडे,हनुमंत कोयते,मनोहर गायकवाड उपस्थित होते.
गावामध्ये एक हजार लोकांनी सहभाग नोंदविला व या अभियानाचा लाभ घेतला ढोल ताशा ची मिरवणूक काढून स्वागत केले. गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले नवलाखउंबरे चे ग्रामपंचायत व सरपंच यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.
संतोष सोनवणे निवडणूक नायब तहसिलदार, अजय सोनवणे मंडलाधिकारी, जाधव साहेब कृषि अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मावळ, कारंडे पंचायत विस्तार अधिकारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.नवलाखउंब्रे सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!