नवलाखउंब्रे:
महाराजस्व अभियानांतर्गत आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून मावळ विधानसभा मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर ला नवलाखउंब्रे येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे, नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत शासकीय यंत्रणा मावळ मतदार संघातील प्रत्येक गावा-गावात जाऊन तेथील नागरिकांना नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवीन रेशनकार्डचे अर्ज स्वीकारणे, रेशनकार्ड दुरुस्ती व जीर्ण रेशनकार्ड बदलून देणे, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा,अपंग व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती करणे, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण), शबरी आवास योजना,रमाई आवास योजना, ७/१२ वरील नोंदी व दुरुस्ती अर्ज स्वीकृती, नवीन वीज कनेक्शन (घरगुती), पंतप्रधान मातृ वंदना योजना, शेती पंप वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादी अनेक शासकीय योजनांचा गरजू व पात्र नागरिकांना लाभ मिळवून देता येणार या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सरपंच कोयते यांनी केले.

error: Content is protected !!