

टाकवे बुद्रुक:
बोरवली येथील वै.ह.भ.प.श्री.नानाभाऊ धोंडिबा शेलार व वैकुंठवासी श्रीमती सखुबाई नानाभाऊ शेलार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संत साहित्याचे अभ्यासक अँड.शंकरमहाराज शेवाळे यांचे प्रवचन झाले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शेलार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवक आमदार सुनिल शेळके यांनी पंचक्रोशीतील विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा विकास निधी देण्यास विशेष सहकार्य केल्याबद्दल शेलार परिवाराच्या वतीने आमदार शेळके यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार सुनिल शेळके यांच्या अनुपस्थिती मुळे त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्वरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोरोना महामारीत मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांना तसेच कीर्तनात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात मृत्यू पावलेले ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अँड शेवाळे यांनी संत ज्ञानेश्वरीच्या ओवीचे निरूपण करताना विविध दाखले देऊन प्रबोधन केले.
आई वडीलांचे महत्व पटवून सांगताना त्यांनी अनेक दाखले दिले. संत ज्ञानेश्वर माऊली पासून स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची त्यांनी ओळख करून दिली.शिक्षणाने साक्षर झालेले आणि स्वतःला उच्च विभूषित मानणारा वर्ग आई वडीलांना वृद्धाश्रम दाखवतो यांची खंत त्यांनी व्यक्त केली.
उद्योजक सुधाकर शेळके, नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक संदिप शेळके, माजी उपसरपंच .किशोर सातकर , नितीन महाजन काकडे,दशरथ सातकर ,माजी सरपंच दत्ता पडवळ, अध्यक्ष .नारायण ठाकर,माजी सरपंच जाखोबा वाडेकर,अक्षय भेगडे उद्योजक,अरुण पवार,बाबाजी महाराज काटकर ,नरहरी आबा केदारी,सुखदेव ठाकर,निवृत्ती जाधव,प्रकाश पवार ,सुभाष आलम ,सुधीर आलम
दशरथ आलम ,मुकुंद शेलार ,अमोल जाधव,गणेश शेलार रोहन शेलार उपस्थित होते.
नगरसेवक किशोर भेगडे,नगरसेवक संदीप शेळके,नितीन महाराज काकडे, किशोर सातकर,दतात्रय पडवळ यांची समयसुचित भाषणे झाली. विकास महाराज खांडभोर यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच नामदेवराव शेलार,निवृत्ती शेलार,सोमनाथ शेलार,सोपान शेलार आणि परिवाराने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




