
तळेगाव दाभाडे:
नवरात्रोत्सव निमित्त ११०० महिला भगिनींसाठी श्री महालक्ष्मी दर्शन घडवले जाणार आहे, नगरसेवक संतोष भेगडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.
रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी, पहाटे ५:३० वाजता भेगडे आळी चौक,तळेगाव दाभाडे येथून ही यात्रा निघणार आहे. यासाठी नियम व अटीचे पालन करावे लागणार आहे.
महिलांनी ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आपले नाव नोंदवावे.
यात्रेस ठरवून दिलेल्या बसमध्येच प्रवास करावा.
• यात्रेला जाण्यासाठी सर्व बस भेगडे आळी चौक,
तळेगाव दाभाडे येथुन पहाटे ५:३० वाजता निघेल याची नोंद घ्यावी.
-अधिक माहितीसाठी-
८३२९१४१९६३/९८६०२८५७४७/९९७५००४३/९९६०८९०८३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांनी केले आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




