वडगाव मावळ :
वडगाव हे तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रमुख ठिकाण आहे. शहराचे नागरिकीकरण वाढत असल्याने प्रशस्त रस्त्या सह शहरातील मुलभुत सेवा सुविधा सुसज्ज असल्या पाहिजेत. या अनुषंगाने वडगाव शहरातील विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला.
यासाठी राज्य पातळीवर पाठपुरावा करण्याचे माझे काम आहे, तुम्ही फक्त कामे दर्जेदार करुन घ्या, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव मावळ नगरपंचायतीत विकास कामांसंदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केले.
नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पुजा वहिले, मुख्याधिकारी जयश्री काटकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे,राहुल ढोरे,सुनिल ढोरे, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पुनम जाधव, दिनेश ढोरे, अर्चना म्हाळास्कर, सुनिता भिलारे,सायली म्हाळस्कर,दिपाली मोरे, प्रवीण चव्हाण,किरण म्हाळस्कर, राजेश बाफना, विशाल वहिले यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके यांनी नगराध्यक्ष मयूर ढोरे व शहरातील नगरसेवकांसह नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात आढावा बैठक झाली. आमदार शेळके यांनी वडगाव मधील रस्ते,पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक नगरसेवकांस त्यांच्या वार्ड मध्ये कोणती विकास कामे सुरु आहेत, कोणत्या समस्या आहेत, आणि प्राधान्याने कोणती विकासकामे करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याची माहिती घेतली.
ज्या विकासकामांसाठी निधी आवश्यक आहे, त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर माझ्याकडे द्यावेत. असे आमदार शेळके यांनी सांगितले.
●नगरपंचायत इमारतीचे काम सुरु करण्याचे आदेश
● कचऱ्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे विविध पर्यायांवर यावेळी चर्चा
● पंपहाऊसचे वीजबिल प्रत्यक्ष पाहिल्यावर वीजबिल कमी करता येऊ शकते. यासाठी एनर्जी ऑडिटची गरज
● कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर पाणीगळती, पाईपलाईन तपासणी करावी
● (कॉंक्रीट रस्ते न फोडता) काही भागात वीजवाहिनी भुमिगत करायची असेल तर तसे प्रस्ताव त्वरित द्या.
अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वागत व प्रास्ताविक नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले उपनगराध्यक्ष पूजा वहिले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!