धुळे : 
ह.भ.प. ताजुद्दीन महाराज क्रांतीकारी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. धुळ्यातील जामदा गावात कीर्तन सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ असलेल्या जामदा गावात यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कीर्तन सुरु झाल्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
कीर्तनकार ताजुद्दीन महाराज हे जन्माने मुस्लीम होते. त्यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती.ते नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन करायचे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वारीला हजेरी लावली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे. 

error: Content is protected !!