वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात प्रथमच भव्य स्वरूपात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, प्रत्येकाला व्यासपीठ मिळावं व आपले कलागुण नृत्या मध्ये सादर करावेत, यासाठी सहयाद्री विदयार्थी अकादमी मावळ, आणि आर्ट्स इवालुशन डान्स अकॅडमी मावळ या दोन्ही संस्थाच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ चे अध्यक्ष चेतन वाघमारे व आर्टस् इव्हलुशन डान्स अकॅडमी चे संस्थांपक हेमंत पानसरे यांनी ही माहिती दिली.
ही स्पर्धा वैयक्तिक व समूह नृत्य अशा दोन प्रकारात होणार आहे.
वैयक्तिक स्पर्धेत १४ वर्षापेक्षा लहान गट व १४ वर्षापेक्षा मोठा गट अशी विभागणी असेल तर समुह नृत्यासाठी सर्व वयोगटा मधील स्पर्धक असतील.
सर्व सहभागी स्पर्धकांना संस्थेच्या वतीने सहभागा बद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
तसेच वैयक्तिक गट १४ वर्षापेक्षा लहान गट मध्ये विजेत्या स्पर्धेकांसाठी बक्षीस पुढीलप्रमाणे असतील
प्रथम क्रमांक – रुपये ३०००रोख रक्कम,
सन्मानचिन्ह व प्रशास्तीपत्रक.
द्वितीय क्रमांक – रुपये २००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशास्तीपत्रक.
तृतीय क्रमांक – रुपये १००० रोख रक्कम सन्मानचिन्ह.
उत्तेजनार्थ – मेडल व सन्मानचिन्ह.
वैयक्तीक गट १४ वर्षापेक्षा मोठा गट मधील विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस पुढीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक – रुपये ५००० रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक.
द्वितीय क्रमांक – रुपये ३००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
तृतीय क्रमांक – रुपये २००० रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशास्तीपत्रक.
उत्तेजनार्थ – मेडल व प्रशस्तीपत्रक.
समूह नृत्य बक्षिस पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक –
रुपये ७००० रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
द्वितीय क्रमांक –
रुपये ५००० रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
उत्तेजनार्थ – मेडल व प्रशस्तीपत्रक.
सदर स्पर्धा ही शनिवार: दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी.सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत असेल.
स्पर्धेचे ठिकाण – लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय,जुना मुंबई पुणे रस्ता, नायगाव,कामशेत मावळ पुणे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व शासकीय नियंमावलींचे पालन करून स्पर्धा संपन्न होतील.
सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान सहयाद्री विद्यार्थी अकादमी मावळ चे अध्यक्ष चेतन वाघमारे, सह्याद्री विदयार्थी अकादमी मावळ संपर्क प्रमुख किरण ढोरे, सह्याद्री प्रतिष्ठान मावळ चे पदाधिकारी सचिन शेडगे, प्रा. लक्ष्मण शेलार सर, सोमनाथ चोपडे.तसेच आर्टस् इवालुशन डान्स अकॅडमी चे संस्थांपक हेमंत पानसरे यांनी केले.

error: Content is protected !!