टाकवे बुद्रुक :
येथील प्राथमिक आरोग्य केद्रावरील लसीकरण केंद्रा बाहेर उभे राहणाऱ्या नागरिकांना ऊन पाऊस यापासून सरक्षंण मिळावे याकरिता महिंद्रा ॲक्सेलो कान्हे यांच्या सी एस आर फंडातून देण्यात आलेल्या निवाराशेड उद्घाटन करण्यात आले
महिंद्रा समुह नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर असते यापुढेही टाकवे गावात सी एस आर फंडाच्या माध्यमातून मदत करत राहु आशी माहिती महिंद्रा कंपनीचे प्लांट हेड श्रीनिवास गंधाले यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना दिली.
यावेळी उपस्थितीत वाइस प्रेसिडेंट चिफ कमर्शियल
दिवाकर श्रीवास्तव,प्लांट चिफ कान्हे लक्ष्मण महाले
,प्लांट हेड श्रीनिवास गंधाले,आय.आर हेड संजय जोशी,कमर्शियल हेड जगदीश परब, प्रोडक्शन हेड वैभव चव्हाण, अभिजित जाधव,पुरुषोत्तम पांडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा आरोटे,सरपंच भुषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,सदस्य सोमनाथ असवले, तालुका युवक अध्यक्ष कॉग्रेस अध्यक्ष विलास मालपोटे, पो.पाटील अतुल असवले, सदस्या सुवर्णा असवले, ज्योती आंबेकर,डॉ. तडवी,सुपरवायझर आनंद साबळे, उपस्थितीत होते.

error: Content is protected !!