
राजगुरुनगर:
आंबोली येथील शेतकऱ्यांनी खरिपात लावलेला भात काढून त्याची झोडपणी केली आहे. अनेक भाताचे वाण आता फुलो-यातून बाहेर पडत असतानाच या बळीराजाने भात झोडपून घरी आणले.
आंबोली येथील कैलास शिंदे हा शेतकरी शेती करतो जोडीला मुंबई शहरात डबे वाहतुकीचा व्यवसाय करतो.भात शेती हे त्याच्या उत्पन्नाचा एक मार्ग.
पारंपारिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल होऊन नवे तंत्र विकसित भात लागवड केली जात आहे.
यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने शेतक-यांना मार्गदर्शन केले जाते. शिंदे यांनी या वर्षांत इंडम या भाताच्या वाणाची लागवड केली .लावणी पासून पुढे हा भात ७५ दिवसात काढायला येतो.भाताची कापणी करून झोडपून भात घरी घेऊन गेला. कमी दिवसात हे पिक हाती आले.
कैलास शिंदे हे मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात व मुंबईत वेळ काढून गावी शेतातली कामे ही करतात.पावसाचा अनियमित व लहरी पणा पाहता शेतकऱ्यांनी कृषी विभागाने विकसित केलेल्या नव्या वाणाची लागवड फायदेशीर ठरू शकते असे बोलले जाते.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




