कामशेत:
महावीर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनाचे औचित्य रुग्णसेवेचा वसा आणि वारसा घेतलेल्या महावीर हाॅस्पिटल ‘डाॅक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करणार असल्याचे सुतोवाच महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले.
जिथे आरोग्य यंत्रणा पोहचत नाही त्या वाडी वस्तीवर दुर्गम भागात महावीर हाॅस्पिटलचे डाॅक्टर जाऊन रूग्ण सेवा करणार आहे. नाणे मावळ, आंदर मावळ व पवनमावळातील गावोगावी महावीरचा फिरता दवाखाना पोहचवून रूग्णांची मोफत आरोग्य सेवा करणार आहे.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली महावीरने हा उपक्रम हाती घेतला आहे.
खेडोपाडी आरोग्याची ही सेवा अगदी मोफत दिली जाणार असल्याचे महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.
विकेश मुथा, महावीर मेडिकल फाऊंडेशनच्या विश्वस्त व कामशेत ग्रामपंचायतीच्या सदस्या अंजना मुथा यांनी सांगितले.
हा फिरता दवाखाना आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या तिन्ही मावळात पोहचणार आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता येणार आहे.या फिरत्या दवाखान्यात डाॅक्टर,नर्स,औषधोपचार करता येणार आहे. जिथे कोणाचा लक्ष जाणार तिथे जाऊन आम्ही ही सुविधा देणार आहेत. उपेक्षित समाजाला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मुथा दांपत्य यांनी सांगितले.
या मागची प्रेरणा स्व.वि.वा.सहस्रबुद्धे (डाॅ. राजाभाऊ), कांचेनबेन मुथा यांची आहे, त्यांच्या प्रेरणेने हे कार्य सुरू करणार असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाली की महावीरचे डाॅक्टर आपल्या भेटीला येणार आहेत. या शिवाय महावीर हॉस्पिटल च्या वर्धापनदिनानिमित्त प्रथम नोंदणी करणा-या ५१ रूग्णांच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे,संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
मूळव्याध,हर्निया,अॅपेन्डिस,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया, अंगावरील गाठ,गर्भाशयाची पिशवीची व्याधी,पोटाचा घेर,वाढलेले वजन अशा अनेक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करता येणार आहे.
सर्वसामान्य रुग्णांसाठी आपले वाटणारे महावीर हाॅस्पिटल कायमचे रुग्णसेवेवर कटिबद्ध आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा विविध उपक्रमांतून रूग्णसेवा करीत आहे.
महावीर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त मूळव्याध,हर्निया,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया,अंगावरील गाठ,व्रण,गर्भाशयाची पिशवी,पोटाचा घेर या शस्त्रक्रिया सवलतीत करता येणार आहे.
प्रथम नोंदणी करणा-या ५१ रूग्णांना ही सवलत देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ९८२२४०३४२२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या बाबतीत अधिक आपल्याला महावीर हाॅस्पिटल मध्ये घेता येईल. आतापर्यंत शेकडो रूग्णांनी या व्याधीवर उपचार घेऊन आनंदात जगत आहेत.
रोजच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या रूग्णांच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी महावीरने ही योजना आणली आहे.

error: Content is protected !!