
वडगाव मावळ:
जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धनचे विभागाच्या वतीने जनावरांसाठी राबवत असलेल्या नाविन्यपूर्ण अपघाती विमायोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यात १३१ जनावरांना प्रत्येकी १५००० रुपये प्रमाणे दिली नुकसान
भरपाई देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर यांनी दिली
पुणे जिल्हा परिषद पुणे कृषि व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदाच.जनावरांसाठी अपघाती विमा ही योजना.राबविण्यात आलेली आहे,या योजने मध्ये
ज्या शेतकऱ्यांचे जनावरे अपघाताने दगावतात
अश्या शेतकऱ्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा
परिषद, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने
नुकसान भरपाई म्हणून १५०००रुपयांची
तात्काळ मदत दिली जाते.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात १७६जनावरांचा अपघाती मृत्यू
झालेले आहे,त्यापैकी १३१ जनावरांसाठी प्रत्येकी १५००० इतकी मदत पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद
यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तालुका निहाय मदत करण्यात आलेल्या जनावरांची संख्या पुढील प्रमाणे: मावळ तालुका-६१ ,खेड-२६ ,जुन्नर-४वेल्हा-२,हवेली-
२दौंड-१,बारामती-२,इंदापूर-५,आंबेगाव-९,भो
र-७,मुळशी-५,पुरंदर ६ ,शिरूर१
अश्या एकूण १३१ अपघात झालेल्या
जनावरांना अपघात विम्याचा लाभ देण्यात
आला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




