
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळमधील आदिवासी गाव अशी ओळख असलेल्या कुसवली येथील विद्यार्थ्यांना एक हजार वह्या व पेनचे वाटप आज करण्यात आले.
पिंपरी चिंचवड येथील भारतीय बौध्दजन समितीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष संजय ऊबाळे, विजय कांबळे, प्रदीप पवार, वामन मसुरे,विष्णु मांजरे , प्रदीप गायकवाड, सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप, प्रा. तृप्ती जगताप यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्याचे काम समिती अंतर्गत असलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुष्पमाला कमिटीच्या वतीने करण्यात येते.
त्यानुसार दूर्गम भाग असलेल्या कुसवली या गावाची आज निवड करण्यात आली होती.
पेन, वह्या, कलर बाँक्स , पेन्सिल आदी साहित्य विद्यार्थ्यांना यावेळी वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक रामेश्वर पवार, सुनिता मोरे, गावच्या सरपंच चंद्रभागा दाते, बाळासाहेब दाते, भाऊ शिंदे, ज्ञानेश्वर चिमटे, संतोष चिमटे आदी यावेळी उपस्थित होते. शाळेसाठी आगामी काळात भरीव मदत करण्यात येईल असे आश्वासन समितीच्या वतीने यावेळी देण्यात आले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




