वडगाव मावळ:
भीमाशंकर ज्योतिर्लिंग ते पदरवाडी येथील अभयारण्यात रोपवे बांधण्यात यावा अशी मागणी खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,दिलीप मेदगे यांनी केली आहे.
रस्ते,जहाज व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देशमुख यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
बारा ज्योतिलिंग पैकी एक असलेले मौजे भीमाशंकर येथील पदरवाडी या आदिवासी गावात नागरिकांना ये जा
करणेसाठी अभयारण्य असल्यामुळे रस्ता नाही .
या नागरिकांना कमीत कमी ७ ते ८ किलोमीटर
चालत जंगलातून भिमाशंकरला चालत यावे लागते. त्यांना दुसरा दळणवळणसाठी कोणताच पर्यायी
मार्ग उपलब्ध नाही .
कोणी आजारी पडले किवां काही झाले तरी त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी कमीत कमी ३ ते ४ तास लागतात त्यामुळे योग्यवेळी उपचार न मिळाल्यामुळे अनेक जण दगावले आहेत.येथील मुले शिक्षणापासून सुद्धा त्यांना मुकावे लागते.
त्याच प्रमाणे रायगड जिल्हयातील व कोकणातील अनेक नागरिक भिमाशंकर येथे दर्शनासाठी पायी
येत असतात या ठिकाणी रोपवे झाला तर आदिवासी भागातील नागरिकांचे आर्थिक जीवनमान
सुधारेल ही बाब देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार गिरीष बापट उपस्थित होते.

error: Content is protected !!