मुंबई:
मुंबई शहरात डबे पोहचवण्याचा व्यवसाय करणारा डबेवाला कोरोनात आलेल्या बेरोजगारीला वैतागून घर सोडून निघून गेला आहे त्याच्या कुटूबियांला आर्थिक मदतीची गरज असल्याचे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.
नाना दत्ता लोहट वय ४३ वर्ष हा नालासोपारा येथील डबेवाला.२२ एप्रिल २०२१ पासुन ते परागंदा झाले आहे. लॅाकडाऊन आणि कोरोनामुळे या डबेवाल्यांचाही रोजगार बुडाला होता. रोजगार बुडाला, आता घरप्रपंच कसा चालवयाचा ही चिंता त्याला सतत भेडसावत होती. घरात पत्नी आणी दोन मुले, गावाकडे वृध्द आई, वडील यांचा उदरनिर्वाह कसा करायचा ही विविंचना त्याला सतत सतवत होती. बहुतेक या विविंचने मुळेच तो घर सोडून परागंदा झाला असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
नाना लोहट परागंदा झाला त्याची तक्रार नातेवाईकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात दिली आहे पण गेले पाच महीने पोलिसांनी त्यांना काहीही खबर दिलेली नाही. त्या मुळे त्याची पत्नी,मुले व आई,वडील सर्व चिंतेत आहेत. गृहखात्याला विषेशता गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील यांना आमची विनंती आहे की नाना लोहट या डबेवाल्याच्या शोधकार्याला गती देण्याची सुचना सबंधीताना द्यावी.
कुटुंबाचा कर्ता माणुसच असा करोनामुळे घर सोडून परागंदा झाला तर त्या कुटुंबाने आपला उदर निर्वाह तरी कसा करायचा ? हा गंभीर प्रश्न त्यांचे कुटुंबापुढे उभा राहीला आहे. या कुटुंबाची आर्थीक परिस्थिती खुपच हालाकीची झाली आहे. मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना आमची नम्र विनंती आहे की करोनामुळे अशी काही कुटुंब आर्थीकदृष्ट्या पुर्णपणे उध्दवस्थ झाली आहेत अशा कुटुंबाला सरकारने विशेष आर्थ सह्हाय करावे की जेणे करून त्या कुटुंबाला थोडीफार तरी आर्थीकदृष्ट्या मदत होईल.
●अधिक माहितीसाठी:
सुभाष तळेकर
अध्यक्ष
मुंबई डबेवाला असोशिएशन
मो. 9867221310
●डबेवाल्याचा मोठा भाऊ कैलास लोहट त्याचे नाव त्यांचा नंबर खाली दिला आहे त्यांना फोन करून अधिकची माहीती घ्यावी ते या बाबत सविस्तर माहीती देतील.
मो. 8999744517.

error: Content is protected !!