वडगाव मावळ:
आंबळे, निगडे,कल्हाट,पवळेवाडी या चार गावात तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार होत आहे. येथील साडे सहा हजार हेक्टर जमिनीवर एमआयडीसी होत आहे. शेतक-यांच्या जमिनीवर औद्योगिकीकरण उभे राहत आहे,ज्यामुळे शेती संपुष्टात येऊन औद्योगिकीकरण होणार आहे. विकासाची ही मोठी संधी चालून आली असताना स्थानिक शेतकरी बांधवांनी गटातटात गुरफटून न जाता आपल्या हक्कासाठी सर्वानी एकत्रित यावे असे आवाहन अध्यक्ष संदिप कल्हाटकर यांनी केले.
कल्हाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात येथे काम करणा-या शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सामूहिकपणे प्रयत्न करून सर्वसामान्य शेतक-यांना न्याय मिळवून द्या असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. समित्या राजकीय पक्षाच्या झाल्या आहेत.आम्हाला शेतकरी माय बाप यांची समिती पाहिजे असे सांगून
कल्हाटकर म्हणाले,”
हात जोडुन सांगतो की,या मध्ये भरडला जातो फक्त माझा गरीब शेतकरी मायबाप. ज्या माणसाला शेती सोडुन राजकारण माहीती नाही. त्या शेतकरी मायबापाने काय करायचे .सर्वानां वाटते आहे की आंबळे निगडे कल्हाट पवळेवाडी या चारी गावा मध्ये एमआयडीसी आली पाहिजे.
ती येणारच पण बाकी सगळीकडे राजकिय नेते कार्यक्रते एकत्र बसतात. तर माझ्या शेतकरी मायबापाच्या हक्कासाठी काळया आईसाठी एकत्र लढु शकत नाही. तुमचे राजकिय हेवे दावे बाजुला ठेऊन शेतकरी राजाच्या काळजाच्या जमीनीच्या तुकड्यासाठी जसे निवडनुक आल्यावर मतदान करायला सगळे चालतात.
तसेच एकत्र येऊ शकत नाही का असा प्रश्न त्यांनी केला. आम्हाला शेतकरी मायबापासाठी शेतकरी बचाव कृती समिती हवी आहे हि हात जोडुन विनंती आहे,गरीब शेतकरी मायबापाला न्याय द्या. एकमेकांवरील आरोप करण्यात वेळ निघुल जाईल म्हणुन एकत्र या दोन्ही समित्या बरखास्त करा. शेतकरी मायबापाची समिती स्थापन करा अशी विनंती संदिप बबन कल्हाटकर, अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

error: Content is protected !!