
कामशेत:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे अंतर्गत,अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथील प्राथमिक शिक्षिका प्रेमकला वैभव पाठक यांना
” शिक्षक ध्येय “कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय नवोपक्रमास प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत चे शाळा समिती सदस्य विक्रम.बाफना शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता देवरे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मधुकर रंगनाथ घायदार संपादक, शिक्षक ध्येय नाशिक आयोजक होते. डॉ.बाबासाहेब गणपत बडे अधिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण संस्था, नाशिक , डॉ. संदीप नामदेव मुळे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी परिक्षक म्हणून लाभले.
राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धेत प्रेमकला वैभव पाठक, यांनी माध्यमिक गट( पाचवी ते दहावी) या गटात सहभाग नोंदवून सादर केलेल्या चला जाऊ या घरातील प्रयोगशाळेत या नवोपक्रमास प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




