टाकवे बुद्रुक:
कल्हाट ते भोयरे या मुख्य रस्त्याला जोडणा-या कल्हाट गावठाण या रस्त्यावर खूप खड्डे पडले होते.ते खड्डे कल्हाटचे विद्यमान उपसरपंच अमोल आगिवले यांनी स्वखर्चातून भरले. पावसाळ्यात हे खड्डे अधिकच मोठे वाढले होते. रोज याच खड्ड्यात प्रवास करीत नागरिक प्रशासनाच्या नावाने आदळआपट करीत होते. रोज याच खड्ड्यातून जाणारे प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते. गावक-यांना होणारा हा त्रास पाहून उपसरपंच अमोल आगिवले यांनी स्वखर्चातुन हे काम केले. शिवाय श्रमदान केले. इतर लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यासाठी असा हा स्तुत्य उपक्रम असून याचे अनुकरण इतरांनी करावी अशी चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. तसेच अमोल आगिवले यांचे अभिनंदन करीत आहेत.

error: Content is protected !!