टाकवे बुद्रुक:
डाहूली तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कांब्रे येथील युवा नेते सुधीर रामचंद्र आलम यांची आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल दाभाडे यांनी आलम यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी सरपंच नामदेव शेलार , माजी ग्रामपंचायत सदस्य सुदाम आलम सदस्य , राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष गणेश काकडे उपस्थितीत होते.
सुधीर आलम म्हणाले,” गाव पातळीवर सामाजिक उपक्रम राबवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहून पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवणार.

error: Content is protected !!