सोमाटणे:
शेलारवाडी येथील होम मिनिस्टर स्पर्धेत मोनिका माळी विजयी तर शुभांगी माळी ठरल्या उपविजेत्या ठरल्या.
श्री.संत सावता माळी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.विजयी स्पर्धकांना गृहोपयोगी वस्तू देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे सुत्रसंचालन संकेत माळी यांनी केले.कोरोनासदृश्य परिस्थिती असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळत झालेल्या या स्पर्धेने महिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.मजेशीर बाबी या स्पर्धेत समाविष्ट असल्याने सर्वांनाच आनंद झाला.
कोरोनाकाळात घरकाम,शेती इ.करुन महिला भगिनी या मुलांच्याही अभ्यासाकडे लक्ष देत आहेत…सतत व्यस्त व कष्टमय जीवन असणाऱ्या महिला वर्गाचे मनोरंजन व्हावे व त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उदात्त हेतूने ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन केल्याचे मंडळाचे अध्यक्ष उत्कर्ष माळी व खजिनदार अथर्व माळी यांनी सांगितले.
बक्षीस वितरण कार्यक्रमात दत्तात्रय माळी,.नंदकुमार माळी,.विनोद माळी,.सुनिल माळी,.योगेश माळी,प्रा.किरण माळी,.तुषार माळी,.अक्षय माळी, सौरभ माळी,.मनोहर दरवडे,.मयूर जाधव उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभाचे सुत्रसंचालन अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सुहास माळी यांनी केले. आभार अवधूत माळी मानले..महिलांच्या सुप्त गुणांना चालना देऊन ते विकसित होण्यासाठी साहाय्य करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!