कामशेत:
मावळ कला विकास संघाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .या वेळी संघटनेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक प्रल्हाद जाधव यांची पोलीस पाटील संघटना कामशेत बीटचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कला संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी ऊपस्थित होते. त्या नंतर नवीन कार्यकारीनी जाहिर करणेत आली.या वेळी संघटनेचे अध्यक्ष पदी सुप्रसिध्द गायक अनिल जोगदंड यांची सर्वानूमते निवड करणेत आली.उपाध्यक्ष पदी देवराम अहिरे व बाबुराव भवार यांची निवड करण्यात आली.
सचिव पदी शंकरराव वैरागर व सह सचिपदी बाळासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदी सुप्रसिध्द गायक व धम्म ऊपासक प्रकाश गायकवाड यांची निवड करणेत आली.संघटकपदी नंदु चौरे , संदिप गायकवाड,दिनेश भालेराव,जयवंत भवार,दत्ता चव्हान ,यशवंत नाईकनवरे यांची निवड करण्यात आली.
कोषाध्यक्ष पदी अरुण भालेराव व सह कोषाध्यक्ष पदी अनिल गायकवाड यांची निवड करणेत आली. सल्लागार पदी भगवान रोकडे,दादाभाऊ अंगवणे,दिपक गायकवाड,पांडुरंग जाधव,तुकाराम मोरे,पोपटराव वंजारे,शिवाजी गायकवाड,बाळासाहेब जाधव,निव्रुत्ती ओव्हाळ,भागन चौरे,विठ्ठल वाघमारे आहेत.

error: Content is protected !!