टाकवे बुद्रुक:
कशाला पंचायत उपक्रमाअंतर्गत किवळे येथे यशस्विनी लेडीज़ टेलर चे उद्घाटन समारंभ संपन्न झाले असुन त्यांचा व्यवसाय वाढवण्यास हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेने त्यांना मदत केली.
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया चे मोहसीन शेख (प्रोजेक्ट मॅनेजर STDC)यांनी सांगितले की ,”किवळे गावात हे पहिलेच लेडीज स्पेशल टेलरिंग मशीन चे दुकान आहे ज्या मध्ये वेगवेळ्या प्रकार चे आणि नवीन वराईटी चे कपडे शिऊन मिळेल.या मुळे आपल्या गावातील महिलांना रोजगारच्या संधी मिळतील.
आणि भविष्यात महिलांचे प्रशिक्षण केंद्र पण सुरु करू या मुळे आपल्या गावातील महिलांना इतर ठिकाणी किंवा इतर गावामध्ये जावे लागणार नाही आणि आपल्या गावातील पैसा आपल्या गावातच् राहील.
या कार्यक्रमाला माजी सरपंच यमुना भाऊसाहेब गवारी,महल्क्ष्मी गटाची अध्यक्ष ललिता मदगे व् सचिव सुवर्णा चिमटे तसेच जागृती गटाची अध्यक्ष प्रियांका मदगे उपस्थित होत्या.
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थेचे मोहसीन शेख , अभिजित अब्दुले ,सविता मदगे पंढरीनाथ बालगुडे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!