वडगाव मावळ:
वाढदिवसानिमित्त केक, बुके किंवा फ्लेक्स यावर खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याच्या
विनंती आमदार रोहीत पवार यांनी केली होती. आमदार रोहीत पवार यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतोय.
पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला पुणे शहरासह राज्यातील इतर शहरातून भेटीसाठी आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचं शालेय साहित्य आमदार रोहीत पवार यांच्या कडे सुपूर्त केले.
यात सुमारे साडे सतरा हजार वह्या ,पेन, पेन्सिल, उजळणी आणि इतर शालेय साहित्याचा समावेश आहे. काही मंडळींनी प्रतिनिधिक स्वरुपात हे साहित्य भेट देऊन नंतर आपापल्या गावात किंवा मतदारसंघातील गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना ते देण्याचा संकल्प केला. जमा झालेलं साहित्यही गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल. पहिल्याच दिवशी साडेसतरा हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
अशा प्रकारे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणाऱ्या या सर्वच मंडळींचे आमदार रोहित पवार यांनी आभारी मानले.

error: Content is protected !!