लोणावळा:
गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचा सामना कार्ला ग्रांमस्थ करत असताना,बदलत्या हवामानामुळे डेंग्यु,मलेरिया या साथीचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही,म्हणून कोरोना बरोबरच डेंग्यु,मलेरिया या रोगाबद्दल कार्ला येथे जनजागृती करण्यात आली.
त्या संदर्भातील उपाययोजने बाबत नागरीकांना माहीती व्हावी म्हणून कार्ला ग्रामपंचायतीच्या सदस्या वत्सला संजय हुलावळे,सदस्य सोनाली सतीश मोरे,सदस्य सचिन किसन हुलावळे,सदस्य सनी भरत हुलावळे यांच्या पुढाकाराने व कार्ला ग्रांमपंचायत व जिल्हा परिषद आरोग्य केंद्र कार्ला यांच्या सहकार्याने जनजागृती अभियानाची सुरूवात करण्यात आली.
गावातील नागरीकांना घरोघरी उपाययोजने संदर्भातील सुचनांची पत्रके वाटण्यात आली. तसेच लाऊडस्पीकर व्दारे जनजागृती करण्यात आली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे,आरोग्य अधिकारी स्नेहल सोनवणे,सतीश मोरे,रमेश जाधव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्षाचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,अक्षय हुलावळे,किसन गायकवाड,साहील हुलावळे,गिरीश हुलावळे, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी म्हाळसकर,अमोल सुतार,संतोष हुलावळे,वंदना गायकवाड,कलाबाई हुलावळे,संगीता शिळावणे इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!