टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल ऋषीनाथ शिंदे यांचा आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी सरपंच भूषण असवले यांच्यासह अन्य जण उपस्थित होते.
ऋषीनाथ शिंदे यांनी भाजपाला रामराम करीत आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच त्यांची टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाली.
पूर्वाश्रमीचे भाजपाचे कार्यकर्ते असलेले शिंदे आंदर मावळ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. तत्पूर्वी आंदर मावळातील नावाजलेल्या पैलवान मंडळीत त्यांची गणती होती.
मावळ,मुळशी,खेड तालुक्यातील अनेक आखाड्यात त्यानी लालमातीची कुस्ती चितपट करून टाकवे करांचे नाव मोठे केले होते. यंदा झालेल्या निवडणुकीत त्यानी बाजी मारली. आणि आता उपसरपंच पदावर ते काम करीत आहे. प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक म्हणून त्याचा नावलौकिक आहे. आज त्याचा वाढदिवस समर्थकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.

error: Content is protected !!