पिंपरी :
पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली असताना तो पाडण्यासाठी जबरदस्तीने पपई व गोळ्या खायला देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका २२ वर्षाच्या तरुणावर व त्याला साथ देणार्‍या त्याच्या लहान बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.
दत्तु बसप्पा पुजारी (वय २२, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार १ मार्च २०२१ रोजी व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षाची मुलगी शौचालयाला जात असताना दत्तु पुजारी याने तिचे तोंड दाबून बाजूला नेले. कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण करुन तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्याने या मुलीला धमकावून वेळोवेळी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब दत्तु याच्या लहान बहिणीला समजल्यावर तिने या मुलीचा गर्भ पाडण्यासाठी तिला दोन पपई व कोणत्या तरी गोळ्या खाण्यास दिल्या. ही बाब मुलीच्या आईला समजल्यावर तिने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे

error: Content is protected !!