
सोमाटणे :
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वराच्या डोंगरावर एका विवाहितेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेतले आहे.
मिताली सोमनाथ धडस (वय २० वर्षे, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मिताली धडस रविवार पासून बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी पोलिसांत धाव घेतली. मितालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली
बेपत्ता मितालीचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेहच घोरावडेश्वर डोंगराच्या वरच्या बाजूस आढळून आला.या विवाहितेचा आधी ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला व नंतर चेहरा विद्रूप करण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. खुनाचे नक्की कारण समजू शकले नाही.त्यामुळे खुनाचे गूढ वाढले असून “प्रेमसंबंध” हे एक कारण असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




