पवनानगर:
पवनमावळातील एक सर्व सामान्य कुटुंबात व पवनमावळातील कोथुर्णे या गावातुन निर्माण झालेले एक उदोयोनमुख नेतृत्व म्हणुन ज्यांचे नाव घेतले जाते ते मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बी.कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि ते संघ विचाराशी ते जु़डले गेले. आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दळवी यांनी १९७९ साली राजकरणात प्रवेश केला .त्यांनी त्या वर्षी आंबेगाव पंचायत समिती गणातुन नांगरधारी चिन्ह असलेल्या जनता पक्षातुन पहिली निवडणुक लढविली. तेंव्हा गल्लीपासुन दिल्लीपर्यंत कॉंग्रेसची एकहाती सत्ता असल्याने जनतेच्या मनावर कॉंग्रेस विचारसरणीचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे दळवी यांनी पहिल्या वहिल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला .
परंतु येथे ते खचुन न जाता पुन्हा उभे राहण्याची स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आणि पुन्हा १९८१ साली सहा गावांची एकत्रिक असणारी कोथुर्णे ग्रुप ग्रामपंचायत लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
तालुक्यातील सर्व कॉंग्रेस विचारसारणीचे नेते एका बाजुला होते यातुन विजयी होणे अशक्य होते. पंरुतु त्या काळीतील पहिला पदवी संपादन केलेला युवा कार्यकर्ता राजकारणात नक्कीच काहीतरी नक्की बदल करू शकतो .या हेतुने गावातील सर्व नागरिकांनी एकत्र होऊन दळवी यांना साथ देण्याचे ठरविले. आणि मोठ्या मताधिक्यांने त्यांना निवडुन दिले. निवडुन आल्यांनतर कोथुर्णे गावची जबाबदारी त्यांच्यावर होती .त्यांना सरपंच करण्याची ही निवडणूक परंतु कोथुर्णे विरोधात उर्वरित पाच गावे असे संघर्षाचे समीकरण तयार झाले.
इतर पाच गावांनी दळवी यांनी कोणत्यही परिस्थीतीत दळवी यांना सरपंच होऊ द्यायचा नाही. असा चंग बांधला तरी देखील या सळ्या अडचणीवर मात करून दळवी १९८१ साली सरपंच पदावर विराजमान झाले. त्यानंतर सलग पंधरा वर्षे त्यांनी गावची सरपंच म्हणुन धुरा संभाळली. त्या काळात ग्रामपंचायत काय असते आणि त्या माध्यामातुमन गावचा विकास कसा केला जातो हे विकासातुन दाखवून दिले .
जनतेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा तालुक्याच्या राजकरणात प्रवेश करण्याचे ठरविले आणि पुन्हा १९८२ साली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढविण्याचे ठरविले आणि त्यांनी त्यावेळी एक मताने पराभवाचा सामना करावा लागला .परंतु येथे देखील खचुन न जाता त्यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला आणि ४० गावंची असणारी पवना कृषक सहकारी संस्थेची निवडणुक लढविण्याचे ठरविले त्यामध्ये ते निवडुन आले आणि १९८७ पासुन ते सलग २० वर्षे ते पवना कृषक संस्थेची त्यांनी चेअरमन पदाची धुरा संभाळली .
आणि संस्थेची वाढ आणि भरभराट त्याच काळात शक्य झाली त्या नंतरच्या काळात १९९१ ते १९९५ या कार्यकालात त्यांनी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन पद भूषविले .त्याच वेळी खरेदी विक्री संघाचा चेअरमन हा मावळ पंचायत समितीची स्विकृत सदस्य होऊ शकतो अशी घटना अस्तित्वात आली ताणि त्यांना मावळ तालिका पंचायत समितीचा सदस्य होण्याचा मान मिळाला. तेथेही दळवी यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आणि त्यानंतर भरकतीय जनता पार्टीने त्यांना १९९६ ते २००१ या कार्यकाळात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणुन काम करण्याची संधी दिली.
त्याकाळा त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले व कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले .त्याचकाळात मावळ तालुक्यात ऊस उत्पादन घेण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली व मावळ तालुक्यातील शेतकरी पारंपारिक भातशेती बरोबर ऊसाचे उत्पादन घेऊ लागला. त्यानंत सन २००१ मध्ये जिल्ह्यात नावजलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक लढविली .यावेळी दळवी,माऊलीभाऊ दाभाडे,बबनराव भेगडे व चंद्रकांत सातकर हे चार उमेदवार रिंगणात होते परंतु काही कारणास्थव ही निवडणुक बरखास्त करण्यात आली. व त्यांची संचालक संधी डावलली गेली. त्यानंतर चांदखेड गणातुन भारतीय जनता पक्षातुन पंचायत समितीची निवडणुक लढविली गेली .व त्यांना तेथे १५ मताांनी पराभव पत्कारावा लागला. त्यावेळी पक्षातील अनेकांना वाटले होते की दळवी हे राजकरणातुन संपले .आत्ता निवृत्त होतील परंतु त्यांनी त्या पराभावतुन शिकत.त्यांनी पुन्हा उभारी घेतली . मावळ तालुका भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली .आणि त्यांच्याच काळात पक्षाचे आमदार निवडुन आणले. भारतीय जनता पक्षाचे विचारधारा त्यांनी मावळ तालुक्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम केले. व पक्ष बांधणीमध्ये मोठे योगदान दिले ,त्याचाच परिणाम म्हणुन मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने २५ वर्षे आमदार व मावळ तालुका पंचायत समितीमध्ये सत्ता अबाधित ठेवली .
या कामाच्या जोरावर त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पक्षाने २०१२ मध्ये पुन्हा काले पंचायत समिती गणातुन पक्षाने उमेदवारी दिली आणि मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचेस उमेदवाराचा पराभ करत विजयश्री खेचुन आणला व पक्षाने त्यांना पंचायत समिती मध्ये पहिले सभापतीपद बहाल केले .त्याचकाळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
एवढेच नव्हे तर सहकारा मध्ये अग्रगण्य समजली जाणारी कोथुर्णे विकास सोसायटीची स्थापना १९६० मध्ये करण्यात आली होती .परंतु राजकारण व समाजकारण करता करता सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने १९७७ साली या सोसायटीचे चेअरमन पद त्यांनी स्वीकारले . आपला सहकार क्षेत्रातील प्रवेष निश्चित केले. तेव्हापासून आजपर्यंत या सोसायटीवर दळवी यांची एकहाती सत्ता आहे.त्यानंतर त्यांनी २००० साली शैक्षेणिक क्षेत्रात प्रवेश करून ज्ञानराज शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून दोन माध्यमिक शाळा सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली. त्यांनतर मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.
परंतु उच्च शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना मध्यावर्ती शिक्षण सोडावे लागले ही खंत मनात त्यांच्या कायम सलत होती. म्हणुन त्यांनी २००८-२००९ मध्ये आपल्या आईच्या नावाने सरूबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज उभे केले .एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलने उपोषण त्यांनी करून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात निर्माण झालेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषीवले. त्यांच्याच काळात ९ ऑगस्ट २०११ रोजी पुणे मुंबई येथे द्रुतगती महामार्गावर आंदोलन करण्यात आले होते.यावेळी शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता .यामध्ये तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते .तत्कालीन सरकारच्या विरोधात संघर्ष करून ही योजना बंद पाडली आहे. अजुनही ही योजनेवर सरकारची स्थगिती कायम आहे.
सामाजिक व राजकीय जीवनात कार्य करत असताना ज्ञानेश्वर दळवी यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले .परंतु येणाऱ्या प्रत्येक संकाटाला तेवढ्याच धीराने व जिद्दीने तोंड देऊन ती संकटे परतावुन लावण्यात आली.यामध्ये काही स्वकीयांकडुन तर विरोधी मंडळीकडूनही अनेक संकटे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला .परंतु त्यांना न डगमगता आज ही तेवढ्याच ताकदीन पुन्हा उभे राहून आपली ताकद विरोधकांनी दाखविली आहे.आगामी होऊ घातलेल्या निवडणुकित महागाव चांदखेड गटातुन जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याची प्रबळ इच्छा त्यांनी भाजप पक्षाकडे दाखवली आहे. जरी उमेदवारी नाही मिळाली तरी पक्ष देईल तो उमेदवार व पक्षाचा आदेश मानुन त्यांना विजयी करण्यासाठी आपण जिवाचे रान करून पवनमावळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखवू अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
( शब्दांकन- संतोष वाघु दळवी
सरचिटणीस – भाजपा क्रिडा आघाडी, मावळ तालुका)

error: Content is protected !!