वडगाव मावळ:
आजोबा,वडील आणि चुलत्यांना आदर्श मानणाऱ्या या युवा नेतृत्वाचा वाढदिवस पै.आनंद अशोकराव आलम..
आंदर मावळाच्या अनेक गोष्टींच्या घडामोडीत ज्यांचं प्रत्येक्षात सहभाग असणारं एक बेधडक व्यक्तिमत्त्व मा.सरपंच कै.दत्तोबा भाऊराव आलम.
यांचे नातू…
त्याच बरोबर कांब्रे गावकारभारात ज्यांचा नेहमी हेराहेरीने सहभाग असतो,सुख-दुःखात आग्रही सहभाग असणारे श्री.अशोकराव दत्तोबा आलम यांचे मोठे चिरंजीव नवतरुणांमध्ये ज्यांचा मोठा बोलबाला असतो.
पै.आनंद आलम यांचा वाढदिवस म्हणजे परिसरातील युवकांचा प्रत्येक्ष भेटी साठी मोठा राबता.
वयाने जरी लहान असला तरी पै.आनंद याने मावळ, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यात आपली दांडगी ओळख निर्माण करत उत्कृष्ट वलय निर्माण केलं आहे.
राजकीय पुढारी असो वा सर्वसाधारण मंडळी,तरुण वर्ग नेहमी या तरुणांबद्दल सर्वांमध्ये एक आदरयुक्त भावना असते.
बोरवली गावचे युवा नेतृत्व पै. अमोल जाधव आणि पै.आनंद म्हंटलं की जय-विरू ची जोडी आख्या तालुक्यात सर्व श्रुत आहे. राजकारण असो वा समाजकारण या दोन्ही कार्यात हे तरुण नेहमी पुढाकाराने सहभागी असतात ही त्यांची खासीयत. सरपंच नामदेवराव शेलार यांच्या तालमीत तयार झालेले हे पैलवान राजकारणात असो की समाजकारणात नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यात आपलं वेगळं वलय निर्माण करतील यात कुठलीही शंका नाही.
आमच्या भावकीत,गावात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात जेव्हा या पुतण्याचा सामाजिक कार्याबद्दल उल्लेख होतो तेव्हा अभिमान वाटतो.
सर्वसामान्यांची फसवणूक न करता,त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी आधार देत,गोरगरिबांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहून त्यांना योग्य ती मदत करणं. हे भावकीचे संस्कार तो कायम सांभाळून ठेवेल, अशी भावना त्यांचे चुलते उद्योजक दशरथ आलम यांनी व्यक्त केली.
तर भविष्यात आपल्या स्वभावाने व स्वकर्तुत्वाने आनंदने असंच आपलं नाव मोठं करत राहावं असे आशीर्वाद त्यांच्या काकी,विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.वैजयंता सुभाषराव आलम यांनी दिले.

error: Content is protected !!