वडगाव मावळ:
मावळ विचार मंच संचलित सरस्वती व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी शंकरराव नंदकुमार भोंडवे यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष पदी सौ.वैशालीताई प्रमोदजी म्हाळसकर , कार्यक्रम प्रमुख पदी सौ.श्रेयाताई पवनजी भंडारी, उपाध्यक्षपदी श्री.मनोज शांतारामजी भांगरे , सचिवपदी गिरीश नेमीचंदजी गुजराणी आणि खजिनदार पदी अ‍ॅड अजित दत्तात्रयजी वहिले यांची निवड करण्यात आली.
व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्ष असून गुरुवार दि. ७ ऑक्टोबर ते गुरुवार दि.१४ ऑक्टोबर पर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्याने सुरू होतील.
शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी – दसरा निमित्त भारतमाता प्रतिमेची मिरवणूक संपन्न होणार आहे.मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जेष्ठ साहित्यीक प्रभाकरराव ओव्हाळ , मावळते अध्यक्ष दिपक भालेराव , मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , जेष्ठ नेते विठ्ठलराव घारे , श्री.पोटोबा देवस्थान संस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे , नगरसेवक अ‍ॅड.विजयराव जाधव , नगरसेवक किरण म्हाळसकर , नगरसेवक प्रसाद पिंगळे , मा.अध्यक्ष अतुल राऊत , रविंद्र काकडे , अरुण वाघमारे, नितीन गाडे, शेखर वहिले, अतुल म्हाळसकर, अमोल ठोंबरे, भूषण मुथा, समीर गुरव, केदार बवरे, अनिकेत सोनवणे, विनय भालेराव, जिजाभाऊ सोनवणे, दिपक शास्त्री, तानाजी शिंदे, सौ. वैशालीताई ढोरे, सौ.अश्विनीताई बवरे , सौ.कांचनताई ढमाले , सौ.सुवर्णाताई गाडे , किरणताई आगळे आदी उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी नूतन कार्यकरिणीला शुभेच्छा देतांना प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांची मेजवानी देण्याचे कार्य संपन्न होणार असल्याचे सांगितले.
अध्यक्ष शंकरराव भोंडवे , कार्याध्यक्ष सौ.वैशालीताई म्हाळसकर, कार्यक्रम प्रमुख सौ.श्रेयाताई भंडारी, उपाध्यक्ष मनोज भांगरे या नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे अधिकाधिक सुरेख पद्धतीने आणि कोरोना नियमांचे पालन करून नियोजन करण्यात येईल असे सांगितले.
स्वागत मावळते अध्यक्ष दिपक भालेराव यांनी , प्रास्ताविक नगरसेवक अ‍ॅड.विजयराव जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अरुण वाघमारे यांनी केले.

error: Content is protected !!