टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ‘महाश्रमदानातून महास्वच्छता’ अभियानास सुरूवात झाली. आंदर मावळातील सर्वात मोठया औद्योगिकनगरी असलेल्या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीने सूरू केलेल्या श्रमदान अभियानास भरघोस पाठींबा मिळाला.
स्वातंत्रय दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हा
परिषद पुणे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व मुख्य कार्यकारी,अधिकारी आयूष प्रसाद यांच्या मार्गदर्शक सुचनेस अनुसरुन ‘महाश्रमदानातून महास्वच्छता’ अभियान संपुर्ण मावळ तालुक्यात राबवीणेस सुरूवात झाली.
याच पार्श्वभूमीवर गुरूवर दि.१६ सप्टेंबर पुढील शंभर दिवस मावळ तालुक्यात महाश्रमदान महास्वच्छता कार्यक्रम राबविले जाणार आहे. तालुक्यामध्ये १०३ ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान करणेत आलेला आहे.
टाकवे बुद्रुक येथे सरपंच भूषण असवले,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मालपोटे,ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा असवले,ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्या प्रिया मालपोटे, ग्रामपंचायत सदस्या आशा मदगे , ग्रामपंचायत सदस्या ज्योती आंबेकर,ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या संध्या असवले उपस्थित होत्या.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार ग्रामपंचायत हद्दीत महाश्रमदानातून महास्वच्छता’ अभियानास सुरूवात झाली आहे. लोक सहभागातून हे अभियान यशस्वी करू. नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचा स्वीकार करावा.
उपसरपंच ऋषीनाथ शिंदे म्हणाले,” स्वच्छता काळाची गरज आहे. माझा गाव माझा अभियान याच धर्तीवर. मी स्वच्छ माझा गाव स्वच्छ ही संकल्पना रूढ होणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले म्हणाले,” वाढत्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छ समृद्ध गाव असणे आवश्यक आहे. अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा परिषदेने राबवलेला या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.
ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा असवले म्हणाल्या,’ स्वच्छेते बाबत सर्वानी जागृक असणे आवश्यक आहे. या बाबतीत महिला अधिक अ‍ॅक्टिव्ह असतात. हे अभियान मर्यादित कालावधी पूरते मर्यादित न राहता त्याचे दर दिवशी उजाळणी व्हावी यासाठी शाळा,महाविद्यालय,तरूण मंडळे आणि महिला बचत गटा मार्फत जनजागृती करून ती स्वच्छता अभियान प्रत्यक्षात उतरवणे शक्य आहे.

error: Content is protected !!